महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये रयत संकुलाने आयोजित केलेल्या कर्मवीर जयंती समारंभात गणेश शिंदे यांचे व्याख्यान..!
श्रीगोंदा, ता. २ : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या रयत शिक्षण संस्थेने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या बोधवाक्यामुळे रयतेमधून नव्या युगाचे स्वावलंबी विद्यार्थी घडत आहेत. शिक्षकांनी
विद्यार्थी घडवण्याचे काम करावे. त्यातूनच आपली ओळख तयार होईल. विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून मोठे व्हावे, असा विचार गणेश शिंदे यांनी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये रयत संकुलाने आयोजित केलेल्या कर्मवीर जयंती समारंभात व्यक्त केला. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री, आ.बबनराव पाचपुते होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा. यशस्वी व्हा. असा विचार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था आहे. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना घडवणारे विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. प्रास्ताविक व स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी केले.अंकुर भितीपत्रिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पीटर रणसिंग यांच्यातर्फे निवडक गरीब विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महावीर पटवा, उद्योगपती संजय मचे,कुंडलिकराव दरेकर ,रवीशेठ दंडनाईक, रत्नप्रभा बोरुडे, जयश्रीताई दरेकर, श्रीमती वामन मॅडम, मुख्याध्यापिका गीता चौधरी, ज्योत्स्ना भंडारी, सुनील पाचपुते,पिटर रणसिंग, मिलिंद दरेकर, पंडितराव अनभुले, आर.डी. लोखंडे, व उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थी -विद्यार्थिनी, रयत संकुलाचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद साळवे यांनी केले. आभार प्रा. शहाजी मखरे यांनी मानले.