टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१५ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा शहराच्या आसपास असलेल्या वाड्या-वस्त्यां मुख्यत्वे साळवनदेवी रोड, भोळे वस्ती, पिंपळे वस्ती, वडवकर वस्ती, आंबील ओढा या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असून, त्याच्या सर्रास दर्शनाने येथील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांना आपले दैनंदिन कामंकाज संध्याकाळी अंधार होण्यापुर्वी उरकून स्वतः सह कुटुंबाला घराच्या आत बंदिस्त करावे लागत आहे.
बिबट दिसल्यानंतर प्रत्यक्ष दर्शीनी वनविभागाला माहिती देऊनही या प्रशासनाकडून कसलीही सकारात्मक कारवाई होताना दिसत नाही. बिबट माणसाळला असून, तो लोकवस्तीत दिसणार… आता लोकांनी त्याची सवय करून घ्यावी. असे उलट उत्तर फोनवर सदरील प्रशासनाचे कर्मचारी देत आहेत.
काल दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास पिंपळे वस्ती, आंबील ओढा परिसरातील दीपक घोडके यांच्या घरा जवळ बिबट्या मुक्त संचार करताना निदर्शनास आला. वस्तीवर अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने घरातील सर्वजण भयभीत झाले होते.
याबाबत वनविभागाचे अधिकारी गुंजाळ यांना फोन करून माहिती दिली. मात्र, बिबट्या कधी घोडेगाव, कधी पिंपळे, कधी भोळे वस्ती, कधी औटेवाडी इथे दिसतो..! मंग वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जायचे कुठे कुठे..? आम्ही पण माणसं आहोत..! अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
या परिसरात बिबट्याचा वावर वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांना वन विभागाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. मात्र, ते लोकांना रामभरोसे सोडून, फोनवर उडवाउडीवीचे उत्तर देताना समोर येत आहेत.
नमूद ठिकाणी या वन्यजीवामार्फत लहान मूल किंवा जनावरांवर हल्ला होऊन, त्यात दुखापत किंवा दुर्घटना होण्यापूर्वी स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करावी.. अनं या बिबटला लोकं वस्तीतून जेरबंद करून, जंगलात किंवा निर्मनुष्य ठिकाणी सोडावे.. अशी प्रतिक्रीय येथील पीडित रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
स्त्रोत:(प्रत्यक्षर्शी)