खासदार निलेश लंके यांची महादजी शिंदे विद्यालयाला सदिच्छा भेट; विद्यालयाचे काम उल्लेखनीय लंके यांचे प्रतिपादन
श्रीगोंदा, ता. १७ : महाराजा जिवाजीराव शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेला श्रीगोंदा व जामगाव पारनेर या ठिकाणी शेकडो एकर जमीन व वाडे दान दिले, या माध्यमातून श्रीगोंदा आणि पारनेर यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘शिंदे घराणे’ आहे . तमाम बहुजन समाजासाठी काम करणारी रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभी केली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करताना अभिमान वाटतो असे प्रतिपादन खासदार तथा जनरल बॉडी सदस्य निलेश लंके यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, महादजी शिंदे विद्यालय गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून असेच इतर शाखांसमोर आदर्शवत उदाहरण ठेवले आहे. त्यामुळेच नुकताच महादजी शिंदे विद्यालयाला ‘उपक्रमशील विद्यालय’ म्हणून पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल त्यांनी प्राचार्य दिलीप भुजबळ व सर्व सेवकांच अभिनंदन केले. महादजी शिंदे विद्यालयाच्या इतरही अनेक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच येणाऱ्या काळात ‘मल्टीपर्पज हॉल‘ व इतर भौतिक सुविधांसाठी भरीव मदत करण्याचा शब्द यावेळी निलेश लंके यांनी दिला.
यावेळी माजी नगरसेवक राजू गोरे, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, ज्येष्ठ शिक्षक विलास दरेकर, अल्ताफ पठाण, संतोष शिंदे, अमोल डोईफोडे, सुरेश गायकवाड, दत्तात्रय मोरे, नरेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.