दौलत (नाना) शितोळे यांना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे यांना विधान परिषद मिळणार..!

विधान सभेच्या निवडणूका झाल्यानंतर रामोशी समाजाचे शिलेदार आणि समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना विधानपरिषद संधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले

मुंबई, ता. १७ : रामोशी समाज अत्यंत इमानदार म्हणून ओळखला जातो राज्यामध्ये रामोशी बेरड आणि बेडर समाजाची लोकसंख्या ८५ लाखापेक्षा जास्त असून या समाजा ला कोणत्याही सरकारने राजकीय लाभ दिला नसून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती राज्य शासनाने साजरी करण्या बाबत परिपत्रक काढून उमाजी नाईक यांना न्याय दिला होता , राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष , उपाध्यक्ष रामोशी समाजातील व्यक्तीला करण्यात यावा तसेच रामोशी बेरड समाजाची राज्यात ८५ लाखापेक्षा जास्त समाज असल्याने तात्काळ विधान परिषदेवर घेण्यात यावा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनात साजरी करावी या मागणी संदर्भात भाऊसाहेब शिंदे यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजी उमाजी नाईक स्मारक भिवडी येथे तीन दिवस आमरण उपोषण केले होते याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांना उपोषण स्थळी पाठवून शिंदे यांना आश्र्वासन देऊन उपोषण सोडले.

त्या नंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाला बोलून रामोशी समाजाचे नेते दौलत नाना शितोळे यांना राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले तसेच विधान सभेच्या निवडणूका झाल्यानंतर रामोशी समाजाचे शिलेदार आणि समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना विधानपरिषद संधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले तसेच उमाजी नाईक यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनात साजरी करण्या बाबत राज्य सरकार पाठपुरावा करनार असल्याचं सांगीतले भाऊसाहेब शिंदे यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्याने रामोशी समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
80 %
5.3kmh
100 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
23 °
Sun
25 °
Mon
26 °
error: Content is protected !!