महाविकास आघाडी कडून अनुराधा नागवडे सोमवारी विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी केले आहे

श्रीगोंदा, ता. २६ : श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांचा उमेदवारी अर्ज सोमवार ता. २८ रोजी सकाळी १० वाजता सादर करण्यात येणार आहे . तरी सदर प्रसंगी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २२६ श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातून सौ. अनुराधा नागवडे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांचा उमेदवारी अर्ज सोमवार ता. २८ रोजी सकाळी १० वाजता महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमवेत उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार आहे. तरी सदर प्रसंगी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साजनभैय्या पाचपुते यांनी केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
27.2 ° C
27.2 °
27.2 °
70 %
2.9kmh
100 %
Sun
28 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
33 °
Thu
34 °
error: Content is protected !!