घन:शाम शेलार यांचा श्रीगोंद्यात प्रहार; बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत विकासाची २१ कलमी ब्लूप्रिंट सादर!

आघाडीला व युतीला छाटणारी आमच्याकडे प्रहाररुपी दुधारी तलवार आहे, त्यासाठी राज्यामध्ये प्रहार पक्षाने एकूण ३५ उमेदवार दिले आहेत त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी बच्चूभाऊ कडू यांनी केले.

श्रीगोंदा, ता. ३१ : घन:शाम शेलार यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून श्रीगोंद्यातून उमेदवारी मिळाली आहे,दि. ३० रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घन:शाम शेलार यांच्याकडून श्रीगोंद्याच्या विकासाची २१ कलमी ब्लू प्रिंट सादर करण्यात आली. यावेळी प्रहारचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घन:शाम शेलार यांनी त्यांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. या २१ कलमी कार्यक्रमात डिंबे माणिक डोह बोगदा, डींबे धरणाची उंची वाढवण्याची योजना, साकळाई योजना लवकर चालू करणार,स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, विसापूर धरण, संत शेख महंमद महाराज तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणे, जिल्हा रुग्णालय, रस्ते व दळणवळण सुविधा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क उपलब्धता, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, स्थानिकांना टोल माफी, भीमा भामाचे पाणी अडवून घोडला लिंकेज, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर विमा मिळण्यासाठी पाठपुरावा, शेतकऱ्यांच्या उसासाठी आमदार निधीतून वजन काटा उपलब्ध करून देणार, धर्मवीर गड विकास, दिव्यांग, विधवा,दुर्बल, घटकांच्या विकासासाठी योजना अशा विविध कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

आमदार बच्चुभाऊ कडू पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले भाजप सरकार किंवा काँग्रेस सरकार दोन्हींचेही बजेट एकच आहे बजेटमध्ये ग्रामीण भागाचा वाटा कमी असल्यामुळे शहरी भागात सुख सुविधा जास्त मिळतात त्यामुळे शहर आणि गाव यामध्ये आर्थिक विषमतेचे उदाहरण निर्माण झाले आहे त्यामुळे सत्तेत आल्यानंतर आधी हे बजेट बदलण्याचे काम करणार. तसेच ऊस कारखानदारीतून काटा मारून गुलामगिरीकडे नेण्याचा प्रताप येथील काही लोक करत आहेत अशा लुटारू लोकांना लोक मत कसे देतात याचे विशेष वाटते जे रोज काटे मारतात त्यांना मताच्या माध्यमातून थोबाडीत मारणार त्यासाठी प्रहार इथे उभी आहे अशी घाणाघाती टीकाही त्यांनी केली. सामान्यांवर आम्ही दादागिरी करत नाही पण मोठ्यांची दादागिरी ही चालू देत नाहीत ज्यांनी लोकांचे पैसे बुडवले अशा लुटारूंना मोठे करत असल्याचे भाजपचे धोरण आहे.

मध्यंतरीच्या काळामध्ये सत्तेमध्ये गेल्यानंतर दिव्यांगांसाठी मोठे काम करता आले त्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले प्रहार कडे विचारांची ताकद आहे पैशाची ताकत लावू शकत नाही सरकारवर टीका करताना ते म्हणाले दिव्यांगांना चार महिने पैसे दिले नाहीत मग लाडक्या बहिणीसाठी पैसे कसे उपलब्ध झाले. आघाडीला व युतीला छाटणारी प्रहार कडे प्रहाररुपी दुधारी तलवार आहे. त्यासाठी राज्यामध्ये प्रहार पक्षा ने एकूण ३५ उमेदवार दिले आहेत त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी बच्चूभाऊ कडू यांनी केले.

यावेळी कार्यक्रमात माधव बनसुडे, राजेंद्र पोकळे, अजीम भाई जकाते, संजय आनंदकर, सुरेश सुपेकर, विनोद सिंग परदेसी, नितीन रोही, दत्तात्रय खामकर, अनारसे ताई, राजेंद्र काकडे, ज्ञानदेव भैलुमे, संतोष गायकवाड, सुरेश गोलांडे यांच्यासह घनश्याम अण्णा शेलार मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.3 ° C
21.3 °
21.3 °
95 %
8kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
27 °
Wed
29 °
error: Content is protected !!