अंमळनेर डोंगरकिन्ही सर्कलमध्ये शैक्षणिक वातावरण तयार झाल्याने अनेक मुले नोकरी धंद्याला लागले – सुरेश धस

आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांनीच मारली मुसंडी..! अडचणीत धावुन येणाऱ्या नेत्याचे गावागावात जंगी स्वागत..!

आष्टी, ता. ६ : अंमळनेर परिसरामध्ये शैक्षणिक वातावरण तयार झाल्यामुळे अनेक मुलं नोकरी धंद्याला लागले अनेक तरुण देश सेवेत सैनिक म्हणून गेले याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे. असे प्रतिपादन सुरेश धस यांनी केले.

२३१ आष्टी-पाटोदा-शिरुर का. विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना- रि.पा.ई. (आ) आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून अंमळनेर व डोंगरकिन्ही सर्कलमधील गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.

सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले, मी जिल्हा परिषद चा उपाध्यक्ष असताना सर्वात अगोदर जरेवाडीच्या शाळेच्या बाबतीमध्ये गावकऱ्यांनी मागणी करत जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष वेधून या शाळेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून देत गोरगरीब सामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याबाबतीमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये एक चळवळ उभा राहिली या चळवळीमध्ये प्रत्येक शिक्षकाने गावकऱ्यांनी योगदान दिले आणि त्यांना लागेल त्या सगळ्या सुख सुविधा पुरविण्यामध्ये मी कुठेही मागे पाहिले नाही. २०१४ नंतर एकही शाळा खोली किंवा शाळेला कोणाचीही व्हिजिट त्या ठिकाणी झालेली नसताना शेवटी आपण आपलं भविष्य घडवण्यासाठी भौगोलिक परिस्थिती आपल्या भागातील अत्यंत खराब आहे परंतु शिक्षण हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं माध्यम हा उदात्त हेतूने शिक्षणाला पुढील अशा पद्धतीने सगळ्या सुविधा देणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी घेऊन ती मी पूर्णपणे या ठिकाणी पार पाडली.हा डोंगराळ भाग असल्याने शेतकऱ्यांना रानडुकराचा या परिसरामध्ये खूप मोठा त्रास होता. याचा बंदोबस्त करण्याचा देखील अनेक वेळा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला.शेतकरी डुकराच्या होणारा त्रासाला वैतागलेला आहे हे दाखव त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असे त्यामुळे मी अनेक प्रयोग केले. असे अनेक विकास कामांसोबत प्रत्येकाच्या अडीअडचणीसाठी मी सदैव तत्पर राहिलो असून या व्यतिरिक्त जो तुमचे काम करत असेल तर आपण लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे तो अधिकार आपण त्या पद्धतीने बजावावा अशी भावनिक साद महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना केली.
याप्रसंगी अंमळनेर व डोंगरकिन्ही सर्कल मधील पांढरवाडी फाटा (गांधनवाडी, पांढरवाडी, संकुडवाडी),खडकवाडी,कोतन (बेदरवाडी),काकडहिरा,अंमळनेर(उंडेवाडी, साबळेवाडी व पन्हाळकरवाडी, डागाचीवाडी, मिसाळवाडी, दौलतवाडी),निरगुडी (बेदरवाडी)पिंपळवंडी (अंबेवाडी, चंद्रेवाडी, जरेवाडी, थोपटवाडी, सरदवाडी,नाकाडवाडी, हांडेवाडी)उखंडा,जाधववाडी (घोळेवाडी, गायकवाडी, भराटवाडी) पिठ्ठी,पांगरी (पांगरी खालील पूर्ण वाड्या व वस्त्या), नायगाव,डोंगरकिन्ही (डोंगरकिन्ही गाव अंतर्गत वाड्या व वस्त्या),रोहतवाडी (भक्ताचे गोठे), कारेगाव (जन्नेवाडी, कंठाळवाडी), डोमरी (अंतर्गत सर्व वाड्यांसह वस्त्या), नाळवंडी (भाटेवाडी, वाड्या व वस्त्या), वड़झरी (सर्व वाड्यांसह वस्त्या), धसपिंपळगाव (तगारा, महेंद्रवाडी, सगळेवाडी) या गावांतील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

प्रचारात सुरेध धस यांनीच मारली मुसंडी. अडचणीत धावुन येणाऱ्या नेत्याचे गावागावात जंगी स्वागत

जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कायम लोकांच्या मतदीला धावून जाणारे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे एकमेक नेते सुरेश धस हे आहेत. आष्टी मतदार संघात त्यांच्या प्रचारात रथ विजयी वेगाने धावत असून दोनच दिवसात सुरेश धस यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. ते ज्या गावात जातील तेथील लोक धस कुटूंब कायम आमच्या मदतीला धावून येतात… इतर नेते केवळ निवडणुकीच्या तोंडावर येतात, अशा बोलक्या प्रतिक्रिया देत सुरेश धस यांचे गावा- गावात जंगी स्वागत करत आहेत. सर्वत्र होत असलेल्या या स्वागताने सर्व जाती- धर्मातील लोक सुरेश धस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
84 %
7.7kmh
100 %
Tue
24 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °
error: Content is protected !!