माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचे अनुभवी आणि तरुणांचे संघटन असलेले नेतृत्व राहुल जगताप यांना समर्थन..!

सौ शुभांगीताई पोटे या जनतेतून नगराध्यक्ष झाल्या पोटे दांपत्याने शहर विकासात केलेल्या कामा मुळे लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना शहरातून मताधिक्य मिळाले – पोटे

श्रीगोंदा, ता. ७ : राज्यात,जिल्ह्यात आणि श्रीगोंदा मतदार संघात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असताना काँग्रेसचे नेते घनशाम शेलार किंवा माजी आमदार राहुल दादा जगताप यांना उमेदवारी मिळावयास हवी होती पण उमेदवारी दुसरीकडे गेल्याने तसेच घनशाम शेलार आणि राहुल जगताप या दोघांनी अर्ज दाखल केल्याने आपण ४ तारखे पर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती नंतर घनशाम शेलार यांनी माघार घेतल्याने सर्व उमेदवारांमध्ये अनुभवी आणि तरुणांचे संघटन असलेले नेतृत्व राहुल जगताप यांचे असल्याने आपण राहुल जगताप यांना समर्थन देत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

सकाळी ११:३० वाजेच्य सुमारास माजी आमदार अपक्ष उमेदवार राहुल जगताप व मनोहर पोटे मिरवणुकीने एकत्र येत ग्रामदैवत शेख महंमद महाराज पटांगण येथे भूमिका स्पष्ट केली पोटे म्हणाले राहुल जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले आमदार असताना कामे केली नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार विजयी झाले आता विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा शहर तसेच तालुक्यात असून प्रचारार्थ फिरणार असून लोकांची मानसिकता जगताप यांच्या वर अन्याय झाल्याची असल्याने सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान मनोहर पोटे यांनी २०१६ ते२०१९ नगराध्यक्ष पद माध्यमातून श्रीगोंदा शहराचे रूप पालटले त्यामुळे २०१९ मध्ये त्यांच्या पत्नी सौ शुभांगी ताई पोटे या जनतेतून नगराध्यक्ष झाल्या पोटे दांपत्याने शहर विकासात केलेल्या कामा मुळे लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना शहरातून मताधिक्य मिळाले यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये समर्थक नगरसेवक समवेत भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांना मदत केली होती तर त्यापूर्वीच्या निवडणुकीत देखील आमदार बबनराव पाचपुते यांना मदत केली होती या पार्श्वभूमीवर मनोहर पोटे कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते अखेर त्यांनी राहुल जगताप यांना समर्थन दिल्याने जगताप यांना शहरात गट मजबूत झाल्याची चर्चा होत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
77 %
6.9kmh
100 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!