ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही – राजेंद्र नागवडे

जगताप यांनी खा.शरद पवार आणि खा. राहुल गांधी यांचा फोटो बॅनर वर लावून दिशाभूल चालवली आहे – नागवडे

श्रीगोंदा, ता. ९ : ज्यांनी शेतकऱ्यांचे वर्षानुवर्ष ऊसाचे पैसे दिले नाही म्हणून ३० गुन्हे दाखल झाले ,शेतकऱ्यांचे वाटोळे केले ,ज्यांनी सरकारचा विकासासाठी आलेल्या पैशातून ४० टक्के कमिशन घेतल्याने कामाचा दर्जा घसरला हे ज्यांच कर्तुत्व ते आमदार म्हणून काय विकास करणार असा सवाल सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केला.

नागवडे म्हणाले निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सहकारात आमचा नागवडे कारखाना ५० वर्षे सलग गळीत हंगाम करत आहे शिवाय उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा सहकारी बँक आदी ठिकाणी चांगले काम केले तुलनेत विरोधी उमेदवार यांचे साखर क्षेत्रात आणि तालुक्याच्या विकासात काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे असे सांगून भाजप उमेदवाराने तर आईला मिळालेली उमेदवारी बदलण्यासाठी शेवटी उमेदवारी मिळाली नाही तर पुण्याला निघून जाईल असे वेठीस धरून उमेदवारी घेतली त्यांना जनता थारा देणार नाही ते पुण्याला जाणार होते त्यांचे स्वप्न जनताच २० तारखेला पूर्ण करणार असून जनता मुंबईला नाही तर पुण्याला नक्की पाठवणार असे सांगितले.

अपक्ष उमेदवार जगताप यांच्या वर टीका करताना राजेंद्र नागवडे म्हणाले २०१४ साली आम्ही त्यांना आमदार बनवण्यात पुढाकार घेतला २०१९ मध्ये त्यांनी उमेदवारी नाकारली कारण दिले की कुकडी सहकारी साखर कारखान्याची घडी बसवायची पण प्रत्यक्षात आज कुकडी कारखाना शेतकऱ्यांचे बिल देऊ शकत नाही शेतकरी चकरा मारत आहे अशा व्यक्तीला खासदार शरद पवार कशी उमेदवार देणार कारण २०१४ साली याच मुद्द्यावर लोकांनी पाचपुते यांना नाकारले होते हे खा.शरद पवार यांना माहीत आहे अशी टीका करत नागवडे म्हणाले जगताप हे स्व.शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरता त्यांनी नागवडे यांचा कारखाना कारभार पहावा ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कधीच थकवले नाही ,ज्यांच्या कुटुंबातील कोणीही जगताप यांच्या बरोबर नाही त्यांचा फोटो वापरण्याचा जगताप यांना अधिकार नाही तसेच महा विकास आघाडी उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांना आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन असताना जगताप यांनी खासदार शरद पवार आणि खासदार राहुल गांधी यांचा फोटो वरून दिशाभूल चालवली आहे पण जनता त्यांना थारा देणार नाही.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!