साखर कारखानदारांचा गर्व मोडून काढण्यासाठी अण्णासाहेब शेलार यांची उमेदवारी – सरपंच ऋषिकेश शेलार

१६ तारखेला वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके यांची श्रीगोंदा तालुक्यात सभा होत असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

श्रीगोंदा, ता. १३ : तालुक्यातील साखर कारखानदार हेच आलटून पालटून उमेदवारी करत आहेत अशा साखर कारखानदारांचा गर्व मोडून काढण्यासाठी, तीस ते पस्तीस वर्षापासूनच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांनी उमेदवारी केली, अशी प्रतिक्रिया कोळगाव येथे प्रचार फेरीच्या निमित्ताने आलेल्या बेलवंडी गावचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी व्यक्त केली.

सरपंच ऋषिकेश शेलार यांनी प्रचार फेरी निमित्त बोलताना सांगितले की श्रीगोंदा तालुका मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पाणी प्रश्न, रस्ते, वीज, एमआयडीसी, साकळाईचा प्रश्न,घोड ,कुकडी, विसापूर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न असून साखर कारखान्यात अलटून पालटून तेच तेच मुद्दे जनतेसमोर मांडून दिशाभूल करत आहेत. अशा प्रस्थापितांना सत्तेची आलेली धुंदी उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांनी सर्वसामान्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात उमेदवारी केली आहे. सध्या प्रस्थापित कारखानदार यांच्या विरोधात समाजात मोठा असंतोष पसरलेला आहे त्यांच्या विरोधात नकारात्मकतेची लाट निर्माण झाली आहे. जनता परिवर्तनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे २००९ च्या तुलनेत यावेळी एक वर्षापासून अण्णासाहेब शेलार यांनी विधानसभेची तयारी केली आहे. सर्वसामान्य मतदारांच्या जोरावरच एक लाख मतदानाचा आकडा पार करून तीस हजाराच्या मताधिक्क्याने अण्णासाहेब शेलार वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रातील पहिले उमेदवार म्हणून निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

समाजातील उपेक्षित , दीनदुबळे ,सर्वसामान्य जनतेला वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तळागाळातील व सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न अण्णासाहेब शेलार यांना माहिती आहेत. येत्या १६ तारखेला वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके यांची श्रीगोंदा तालुक्यात सभा होत असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

अण्णासाहेब शेलार यांच्यावर सुरुवातीला आरोप झाले की, चार तारखेपर्यंतच शेलार उमेदवार असणार आहेत . त्या दिवशी ते माघार घेतील.नंतर असा अपप्रचार झाला की निवडणूक लढणार नाहीत, कोणाला तरी पाडण्यासाठी उभे राहिले आहे. परंतु सध्याचे आकडेवारी सांगते आहे की, अण्णासाहेब शेलार यांनी निवडून येण्यासाठीच उमेदवारी केली आहे हे येत्या २३ तारखेला मतदानाद्वारे सिद्ध होईल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा तालुक्यातील जनता पाण्यासाठी झगडत असताना कुकडी पाणी प्रश्न ,रस्ते ,वीज ,पाणी, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अण्णासाहेब शेलार यांची उमेदवारी असून आजपर्यंत प्रस्थापितांनी भूलथापा मारल्या. परंतु जनतेची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अण्णासाहेब शेलार हे जनतेच्या प्रश्नाला बांधील आहेत. त्यामुळे तीस हजाराच्या मताधिक्याने अण्णासाहेब शेलार निवडून येतील असा ठाम विश्वास ऋषिकेश शेलार यांनी प्रचार फेरी दरम्यान व्यक्त केला.

चौकट

पाचपुते, नागवडे, जगताप यांच्यावर टीकास्त्र…

श्रीगोंदा तालुक्यात जो सर्वे झाला त्यात एका उमेदवाराचे नाव नव्हते त्यामुळे सध्याचे उमेदवार नाराज असतानाही कार्यकर्त्यांना पुढे घालून युवराज यांनी स्वतःकडे उमेदवारी खेचल्याचा आरोप करून हे युवराज सध्या ठेकेदारांकडून टक्केवारी उकळीत आहेत परंतु रस्त्याचे प्रश्न जैसे ते आहेत. शिरूर फाटा ते बेलवंडी हा रस्ता तीन महिन्यापूर्वी पूर्ण झाला. परंतु निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. यावरूनच युवराजांच्या कामाचा दर्जा समजतो अशी टीका शेलार यांनी केली. तर एका कायम पक्ष बदलणाऱ्या उमेदवाराने आर्थिक तडजोडी केल्याने जरी उमेदवारी मिळवीली तरी ती जनतेला रुचलेली नाही.त्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ज्या पक्षाची धोरणे, उमेदवारी मिळविण्या अगोदर जनतेसमोर मांडत होते त्याच पक्षांच्या विरोधात त्या धोरणांना विरोध करण्याचे काम सध्याचे उमेदवार करत आहेत. लोकांना काही कळत नाही, लोकांना गृहीत धरणे हे साफ चुकीचे आहे, अशी टीका नागवडे यांच्यावर केली. तसेच कारखान्यातील ऊस उत्पादकांची देणी पूर्ण करूनच नंतर उमेदवारीचा निर्णय घ्यावयास हवा होता अशी टीका राहुल जगताप यांच्यावरही केली.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!