अण्णासाहेब शेलार हे निर्णायक मतसंख्या गाठणार असल्याची लोकांमधून चर्चा..!

अण्णासाहेब शेलार यांच्या सक्रिय कार्यामुळे श्रीगोंदा – नगर तालुक्यातील हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे.

श्रीगोंदा, ता. १४ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. निवडणुकीची रंगत आता वाढत आहे तीनही प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या बरोबरीनेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब शेलार यांनीही प्रचारात सक्रिय प्रवेश केला आहे. शेलार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या कामामुळे श्रीगोंदा – नगर तालुक्यातील हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे.

 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार आणि त्यांचे चिरंजीव सरपंच ऋषिकेश शेलार यांनी ओबीसी, तसेच वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या घटकांमध्ये आपली जागा पक्की केली आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेने वंचित बहुजन आघाडीला या घटकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. शेलार यांनी विविध भागांमध्ये कॉर्नर सभा, बैठका आणि चर्चासत्रांचे आयोजन करून लोकांच्या समस्या समजून घेण्याचे काम करीत आहेत. या उपक्रमांमधून ओबीसी आणि मागासवर्गीयांसह अल्पसंख्यांक समाजातील बांधवांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यास शेलार यांना यश आले आहे.

मांडवगण येथे झालेल्या कॉर्नर सभेत शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेतला, ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे विचार मानणारे आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारीही शेलार यांच्या सोबत असल्याचे समोर आले आहे.

 जनमतानुसार अण्णासाहेब शेलार हे निर्णायक मतसंख्या मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आंबेडकरवादी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आणि शेलार यांचा राजकीय प्रभाव या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम निवडणुकीत दिसून येत आहे. त्यामुळे अण्णासाहेब शेलार हे प्रस्थापित नेत्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

येत्या १६ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आले आहे, या सभेमुळे मतदारसंघातील मतांचे गणित अण्णासाहेब शेलार यांच्या बाजूने बदलू शकते. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी चर्चा सगळीकडे होत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!