आठ दिवसांमध्ये मतदारसंघामधील तब्बल ११५ गावांचा दौरा करून जनतेशी संवाद साधला – सुवर्णा पाचपुते

स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, मागण्या आणि अपेक्षा समजून घेतल्या – सुवर्णा पाचपुते

श्रीगोंदा, ता. १७ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघामधील गाव संवाद दौरा करत असताना मागील आठ दिवसांमध्ये मतदारसंघामधील तब्बल ११५ गावांचा दौरा करून जनतेशी संवाद साधला समस्या जाणून घेतल्या आणि विकासाचे आश्वासन दिले अशी माहिती अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी दिली.

यावेळी स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, मागण्या आणि अपेक्षा समजून घेतल्या.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली. गावकऱ्यांच्या मते या समस्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. यामुळे आगामी विधानसभेत परिवर्तन घडवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला.

बदल अटळ आहे या भूमिकेतून सर्व स्तरांवरील नागरिकांनी पाठिंबा व्यक्त केला. त्यांच्या विश्वासाला खरे उतरून विकासाची नवी दिशा देण्यासाठी कार्य करण्याचा दृढ निश्चय करून पाचपुते यांनी मतदारांना आश्वासित केले.

ना कारखाना, ना शिक्षण संस्था, ना परदेशात कंपनी, गावागावात फक्त सामान्य जनतेचा पाठिंबा मिळवणं हाच हेतू , जनतेची साथ हीच आमची संपत्ती असून येत्या २० तारखेला श्रीगोंदा अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुवर्णा सचिन पाचपुते यांनी प्रेशर कुकर या निशाणीला मतदान करण्याचे आवाहन केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
82 %
7.9kmh
100 %
Mon
23 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
28 °
Fri
30 °
error: Content is protected !!