अखेर श्रीगोंद्यातील चांभूर्डी उखलगाव शिव रस्ता झाला खुला; खुले होणारे शिव पानंद शेतरस्ते खऱ्या अर्थाने शेतऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग..!

श्रीगोंदा तहसीलदार डॉ.क्षितिजा वाघमारे यांचे मार्गदर्शन,सहकार्याने व शिव पानंद शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्य प्रणेते शरदराव पवळे, दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुका चळवळ कृती समिती प्रमुख राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नांना यश

श्रीगोंदा, ता. ९ : गेल्या अनेक वर्षांपासून चांभूर्डी उखलगाव शिवरस्ता बंद असून अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हा रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या रस्त्यामुळे शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री शेतात घेवून जाता येईल शेतकऱ्यांच्या शेतीपुरक व्यवसायांमंध्ये प्रगती होईल त्याचबरोर शेतकऱ्यांचा दळणवण्याचा प्रश्न सुटला असून खऱ्या अर्थाने प्रगतीचा महमार्ग खुला झाल्याचे शेतकऱ्यांना आज अनुवभवयास मिळत आहे.

यासंदर्भात श्रीगोंदा तहसीलदार डॉ.क्षितिजा वाघमारे यांच्या मार्गदर्शन,सहकार्याने व शिव पानंद शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्य प्रणेते शरदराव पवळे / दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुका चळवळ कृती समिती प्रमुख राजेंद्र नागवडे ,अँड.कडूस पाटील, मेजर संतोष ढगे, परेशजी वाबळे साहेब रामचंद्र अडसरे गुरुजी, सुनील गायकवाड, जालिंदर कातोरे, गुरु गायकवाड, राजेंद्र उंडे मेजर पवार(लिंपणगाव) बापूराव जंगले व इतर सदस्यांच्या तहसील पाठपुराव्याने व संतोष ढगे मेजर साहेब यांच्या निस्वार्थ अथक परिश्रमानंतर चांभूर्डी व उखलगाव मोजणी हद्दी खुणा निश्चित करून ३३ फुटी रुंद दोन किलोमीटरचा पूर्ण रस्ता जेसीबी लावून अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

यावेळी मोजणी अधिकारी एखंडे,महिला पोलिस नाईक सुरेखा वलवे,होमगार्ड जगताप, सर्कल भाऊसाहेब गिरीश गायकवाड तलाठी भाऊसाहेब सरोदे (माजी सैनिक), पोलीस प्रशासन अधिकारी यांचे खूप सहकार्य मिळाले यावेळी चांभूर्डी इतर शेतकरी उपस्थित होते सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी व ग्रामस्थ यांचे चळवळ कृती समिती श्रीगोंदा वतीने खूप आभार व्यक्त करण्यात आले रस्ता खुला होत असताना राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व श्रीगोंदा शेतरस्ते कृती समितीचे प्रमुख राजेंद्र नागवडे,मेजर संतोष ढगे,सागर ढगे आदी उपस्थित होते यांसह प्रसारमाध्यमांचे महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी आभार मानले.

चौकट
श्रीगोंदा चांभूर्डी शिवरस्ता खुला झाल्यामुळे इतर गावांनाही त्याची प्रेरणा मिळेल..!
शेतीला शेतरस्ता मिळाल्यास शेतकऱ्यांचा दळणवणाचा प्रश्न मिटेल शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाला त्यांना बाजारात घेवून जाता येईल आपल समुद्ध शेतकऱ्यांच समृद्ध महाराष्ट्राच स्वप्न पुर्ण होईल नागरिकांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील यांनी मत व्यक्त केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!