क्षमता आणि मर्यादा यांचा वापर आपण किती करतो यावर यशस्वी होण्याचा मार्ग अवलंबून असतो – युवराज पाटील

श्रीगोंदा, ता. १८ : लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे दि.१७, १८ व १९ जानेवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे आयोजिन करण्यात आले होते व्याख्यानमालीचे हे १७ वे वर्ष आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनुराधाताई नागवडे यांनी केले आहे.

दि. १७ रोजी पहिले पुष्प गुंफले सुप्रसिद्ध व्यख्याते युवराज पाटील यांनी विषय होता “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” याविषयावर बोलताना ते म्हणाले उज्वल भविष्या साठी जर तुम्ही स्वप्न पहिली असतील तर ते विसरता कामा नये सतत त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावत राहिले पाहिजे तरच तुमचे उज्वल भविष्य घडू शकते. क्षमता आणि मर्यादा यांचा वापर आपण किती करतो यावर यशस्वी होण्याचा मार्ग अवलंबून असतो. क्षमतांचा वापर चुकीच्या ठिकाणी झाला की आयुष्य उध्वस्त होते तर योग्य ठिकाणी क्षमतांचा वापर केला तर यश सहज सोपे होते. मेहनती शिवाय काहीच भेटत नाही ही खूणगाठ आपण बांधणे गरजेचे आहे प्रामाणिक कष्ट करत रहा शंभर टक्के यश तुमचेच आहे. सातत्याने २५ वर्ष एकाच विषयावर काम करा नंतर हिशोब करा काय कमवलं आणि काय गमावलं, त्यावेळी तुम्हाला जाणवेल तुम्ही यशाच्या शिखरावर विराजमान असाल. मन मंगट आणि मेंदू हे स्वतःच्या ताब्यात असावे ते जर दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर वागण्यात दांभीकता येऊन चांगलं आणि वाईट यातील फरक तुम्ही ओळखू शकनार नाहीत. आज-काल केक कापण्यासाठी सुद्धा तलवार हातात धरली जाते छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तलवारी ऐवजी तंत्र आणि व्यापार हातात घेतले असते. संस्कार हिन शिक्षण अन मूल्य हिन शिक्षण असेल तर ते तुम्हाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकत नाही बुद्धिबळात प्यादे ही सहा घरे चालले तर त्याचाही वजीर होतो त्याप्रमाणे संयम, जबादारी, नम्रता, चारित्र्य, आई वडिलांचे आदर्श, योग्य वेळी योग्य ठिकाणी असायला हवं असे हे जीवनातील सहा घरे तुम्ही चाललात तर तुमचे आयुष्य यशस्वी होते.

या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे होत्या, प्रमुख पाहुणे धनसिंग भोईटे, विठ्ठलराव जंगले, योगेश भोईटे, दिनेश आदिक, विजय मुथा,सुरेश रसाळ सर, धर्मनाथ काकडे, विलास काकडे, प्राचार्य सतीशचंद्र सुर्यवंशी सुनीता लकडे,मनीषा मुथा, पूनम फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक वर्ग व विध्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
84 %
7.7kmh
100 %
Tue
24 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °
error: Content is protected !!