नागवडे साखर कारखाना अंतिम भाव ३०५० रु. देणार; चांगले गाळप झाल्यास आणखी विचार करू – राजेंद्र नागवडे

श्रीगोंदा, ता. ३० : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन २०२४ — २५ या चालू गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास तीन हजार पन्नास रुपये प्र. मे. टनाप्रमाणे अंतिम ऊस भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही. सातत्याने चांगला ऊस भाव देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. सभासद शेतकऱ्यांना मागील २०२३ –२४ मध्ये दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षीची एफ. आर. पी. सह २९०० प्र. मे. टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. त्याचप्रमाणे चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता २८०० रुपये प्र मे. टनाप्रमाणे दि. ३१ डिसेंबर २०२४ अखेरचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली आहे.

प्रसिद्धी पत्रकार नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने नागवडे कारखान्याने सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर व इतर पूर्तता केलेली असून सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागवडे कारखाना ऊस भावात कधीही मागे राहणार नाही. म्हणूनच चालू सन २०२४ -२५ चे गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या उसास प्र. मे. टन रुपये ३०५० अंतिम भाव देण्याचा निर्णय संचालक मंडळांने घेतलेला आहे. जर उद्दिष्टापेक्षा चांगले गाळप झाल्यास त्याहीपेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील असे नागवडे यांनी म्हटले आहे.

तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
81 %
8kmh
100 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
29 °
error: Content is protected !!