उसाला ३०५० रू दर जाहीर केल्याबद्दल राजेंद्र नागवडे व सर्व संचालक मंडळाचा सत्कार

श्रीगोंदा, ता. ३१ : स्वर्गीय शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या विचार प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटीबद्ध राहून कारखाना हितासाठीच काम करणार असल्याची ग्वाही सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.

चालू सन २०२४ -२५ गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या उसास तीन हजार पन्नास रुपये प्र. मे. टन ऊस दर जाहीर केल्याबद्दल राजेंद्र दादा नागवडे मित्रमंडळाच्या वतीने कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व सर्व संचालक मंडळाचा सत्कार बुधवार दि २९ रोजी सायंकाळी पिकनिक पॉईंट मखरेवाडी श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

स्व. शिवाजीराव नागवडे यांनी ऐन तारुण्यात श्रीगोंदा तालुक्याच्या समाजकारणात व राजकारणात उडी घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नागवडे कारखान्याची उभारणी केली. पाट पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, दळणवळणाचा प्रश्न सोडवून शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले. त्यांनी दिलेले विचार संस्कार व प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण सदैव उराशी बाळगून सभासद शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या हितासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन नागवडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संचालक अंबादास दरेकर होते. यावेळी राजेंद्रदादा मित्र मंडळाच्या वतीने व विविध संस्थांच्या वतीने चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर यांनी एकरी १२५ में.टन तर लोणी व्यंकनाथ येथील तरुण शेतकरी दीपक खोले यांनी एकरी १२० में. टन ऊस उत्पादन काढल्यामुळे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी संचालक विलासराव काकडे,‌ रमेश गायकवाड, ॲड. सुनील भोस, तुळशीराम रायकर, सुरेश लोखंडे, दत्तोबा कातोरे, डॉ. दिलीप भोस, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, नगरसेवक संतोष कोथिंबीरे, प्रशांत गोरे, निसार बेपारी पोपटराव बोरुडे, विठ्ठल वाळुंज, सुदाम औटी, सुभाष भापकर मेजर चांगदेव पाचपुते, मेजर शिवाजी नलावडे, माणिकराव ढगे, विक्रम पाचपुते, शिवाजी ननवरे जयराम धांडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर खाते प्रमुख यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी संचालक सुभाष शिंदे, हेमंत नलगे सर, माऊली हिरवे, पंडित कातोरे गणेश गायकवाड, सतीश मखरे सर, अभिषेक रायकर, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत, सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाऊसाहेब बांदल यांनी केले तर संचालक भाऊसाहेब नेटके यांनी आभार मानले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!