परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात..!

श्रीगोंदा, ता. ५ : परिक्रमा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नहसंमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परिक्रमा शैक्षणिक संकुलनाचे अध्यक्ष डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते, यांच्याहस्ते पार पडले.त्यावेळेस प्रमुख पाहूणे, वसंत हंकारे सर, परीक्रमा शैक्षनिक संकलनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रतापसिंह बबनराव पाचपुते , परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे सचिव तसेच श्रीगोंदा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रसिंह बबनराव पाचपुते,अतिरिक्त मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.अनिल पुंड व सर्व विभागाचे प्राचार्य, वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष , व विद्यार्थी सचिव उपस्थित होते.यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

त्यानंतर शैक्षणिक गुणवत्तेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व राष्ट्रीय पातळीवर रोबोट , AI व projet स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थीचा सन्मानचिन्ह व प्रशिस्तीपत्र देउन गुणगौरव करण्यात आला राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा देशातील नामांकित IIT संस्था तसेच इतर महाविदयालयात पार पडल्या. तसेच परिक्रमा शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची PhD पूर्ण झालेल्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये इंजिनिअरींग विभागाचे डॉ. सुधीर दिवेकर, डॉ. हरिश अवचट, डॉ. आरती सूर्यवंशी तंत्रनिकेतनचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी, फार्मसीचे डॉ. मेघना रायकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच, श्रीगोंदा-नगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांचा सत्कार समारंभ परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या वतीने करण्यात आला व त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तीन दिवस चालणाऱ्या

कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली.विद्यार्थ्यांनी नृत्य,नाट्य, गायन, यांसारख्या विविध कलाप्रकारा मध्ये आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

संपूर्ण स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यासह पालक व शिक्षकांनी मोठ्‌या प्रमाणात प्रतिसाद दिला.महाविदयालयाच्या प्रशासनाने यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
71 %
9.6kmh
100 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
29 °
error: Content is protected !!