पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन;भव्य रोगनिदान शिबिर तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा!!

टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.२० सप्टेंबर २०२२ :
भारताचे विकासाभिमुख प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी आ.सुरेश धस यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या सेवा पंधरवडात भव्य रोगनिदान शिबिर,रक्तदान शिबिर,वृक्षारोपण तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रम आष्टी, पाटोदा, शिरूर कासार मतदारसंघात आयोजन केले असून याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे आ.सुरेश धस यांनी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवडा हा उपक्रम देशभरात साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने आष्टी, पाटोदा, शिरूर कासार मतदारसंघात आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दि. २४ सप्टेंबर रोजी आष्टी शहर तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.दिनांक २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समर्पण कार्याला उजाळा देणारा कार्यक्रम मोरेश्वर लॉन येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच दि. २७ ऑक्टोबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये बालरोग तज्ञ,दंतरोग तज्ञ,स्त्री रोगतज्ञ, हाडांचे स्पेशालिस्ट एमडी मेडिसिन असणारे तसेच महिलांसाठी एचडी तपासणी करणाऱ्या विशेष डॉक्टरांना निमंत्रित करून हे शिबिर पार पडणार आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तसेच गट आणि गण निहाय रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आष्टी शहर तसेच तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन विधान परिषदेचे सदस्य आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून दिनांक २५ सप्टेंबर रोजी आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात वाडी,तांडा, वस्तीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची पूजन व त्यांच्या जीवनपटावर आधारित पुस्तकांचे मोफत केले जाणार आहे.

स्त्रोत:(प्रवीण पोकळे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
81 %
8.3kmh
72 %
Sun
24 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
28 °
error: Content is protected !!