श्रीगोंदा : मांडवगण येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि सन फार्मा लॅबोरेटरी लिमिटेड यांच्या वतीने महिलांना सायकल कोळपेचे वाटप..!

श्रीगोंदा, ता. ७ : तालुक्यातील मांडवगण येथे दि. ५ रोजी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) सन फार्मा लॅबोरेटरी लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ‘जलसुरक्षाद्वारे ग्रामीण समुदायाचे जीवनमान सुधारणे प्रकल्प’ राबवत आहे त्यानिमित्ताने या प्रकल्पांतर्गत मांडवगण गावातील एकूण २९ बचत गटांतिल शेतकरी महिलांना १४५ सायकल कोळपे वाटप करण्यात आले.

महिलांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी देण्यात आले, शेतात पारंपारिक पद्धतीने महिला खुरपणी करत असताना त्यांना अधिक श्रम लागत असे तसेच पाठ दुखीचा त्रास ही होत असे त्यावर पर्याय म्हणून सायकल कोळपे अतिशय परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे महिलांचा कामाचे ओझेही कमी होईल तसेच कमी वेळेत जास्त कामे होतील.

सदरील कार्यक्रमास वॉटर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक लोमेश जोरी,तांत्रिक अधिकारि स्वप्निल अंतरे, सामाजिक अधिकारि जीवन खरात, मांडवगण ग्राम विकास समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, श्रीराम असंघटित बांध कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष माऊली कन्हेरकर, ग्रामस्थ शुभम घोडके ,अशोक भुतकर, आणि बचत गटातील महिला व आशा सेविका सौ वर्षा चव्हान, व बचत गटातील सदस्य सौ सविता घोडके. ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ वंदना शिंदे, आदी उपस्थित होत्या.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.3 ° C
38.3 °
38.3 °
9 %
6.8kmh
2 %
Thu
38 °
Fri
37 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
39 °
error: Content is protected !!