श्रीगोंदा, ता. ११ : भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा, दक्षिण जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन बैठक मावळते जिल्हाध्यक्ष भगवंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नालंदा बुद्ध विहार नालेगाव, अहिल्यानगर येथे संपन्न झाली. यावेळी अहिल्यानगर बौद्ध महासभा जिल्हाअध्यक्ष पदी राजेंद्र साळवे तर सरचिटणीसपदी सतीश ओहोळ यांची निवड करण्यात अली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अशोक केदारे, राज्य संघटक गौरव पवार आदि मान्यवराच्या उपस्थित होते.
यावेळी कार्यकारणी जाहीर करण्यात आली कोषाध्यक्ष विजय हुसाळे उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, पंडित मोरे, कार्यालयीन सचिव वीरेंद्र पवार, हिशोब तपासणी संतोष कांबळे, सचिव रेवनाथ साळवे बलभीम जावळे , राम गायकवाड, रवींद्र कांबळे, संघटक धोंडीबा राक्षे , माधव चाबुस्कर अरुण भोंगळे भगवान ओहोळ गिरीश गायकवाड दिगंबर कांबळे बाळासाहेब धस संरक्षण विभाग प्रमुख किशोर कांबळे व संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.