श्रीगोंदा, ता. ९ : कैलास बोराडे यांच्या वरती अमानुषपणे हल्ला प्रकरणी बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य व बहुजन समाजाच्या व वंचित घटकांच्या वतीने श्रीगोंदा तहसील येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. बहुजन समाजातील वंचित घटकांनवरती अमानुषपणे अत्याचार चालू आहेत व कसलीही भिंती गुन्हेगार यांना राहिलेली नाही म्हणून तर कैलास बोराडे याला अमानुषपणे जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागल्या आहेत असे सांगत वामनभाऊ भदे यांनी निषेध व्यक्त केला.
मंदिरात जायचं नाही व जाऊन द्यायचं नाही म्हणून तापलेल्या सळईचे संपूर्ण शरीराला चटके देऊन मन भरलं नाही म्हणून काय त्यांच्या गुप्त भागावर चटके दिले इतक्या खालच्या थराला मानुस जात असेल तर माणुसकी शिल्लक राहिली नाही मग अशा नराधमांना कडक शासन झाले पाहिजे कायद्याचा धाक राहिला नाही असे दिसत आले आहेत.रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात रांझ्याच्या पाटलांन महिलांवरती अतिप्रसंग झाला म्हणून त्या पाटलांचे हातपाय छाटले त्याप्रमाणे वाईट प्रवृत्तींना कडक शासन झाले पाहिजे. असे प्रकार थांबले नाहीत तर बहुजन समाज रस्त्यावर उतरून संघर्ष केल्या शिवाय राहणार नाही असं मत भदे यांनी व्यक्त केले
बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य हि संघटना बहुजन समाजाला आर्थिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सक्षम करायचं काम करनार असुन तरुण कार्यकर्त्यांची फळी उभा करुन बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करनार आहे असे वामनभाऊ भदे यांनी सांगितले तसेच झालेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सावता भाऊ हिरवे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माऊली वाडगे राजेंद्र डाळिंबे विजय शेंडे कांतीलाल कोकाटे मनोज शिंदे हारी खामकर अविनाश गाजुरे राजेंद्र कोथिंबिरे कुंडलीक गावडे पिनु भैलुमे दस मॅडम वैशालीताई भदे सुदामती गोरे कविता गाजुरे गंगुबाई शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.