श्रीगोंदा : परिक्रमा तंत्रनिकेतन, काष्टीच्या ३९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड!

श्रीगोंदा, ता. ९ : परिक्रमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची यशोगाथा कायम राखली आहे. ३९ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी,पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉलेज इंटरव्यू मध्ये मैकेनिकल आणि इलेक्ट्रिकल विभाग मधील विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजीनियर (Trainee Engineer) म्हणून निवड झाली आहे.

काष्टी येथील बबनराव पाचपुते विचार धारा ट्रस्टचे परिक्रमा शैक्षणिक संकुलनातील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे, येथील शिक्षणाचा दर्जा, उत्कृष्ठ वसतिगृह तसेच इतर असणाऱ्या सुविधा त्यामुळे महाराष्ट्रातून विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. प्रतापसिंह पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी अनिल पुंड सर, डेप्युटी अॅकॅडेमिक डायरेक्टर प्रा.डॉ.संजीव कदमपाटील सर तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर, यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

तसेच इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. मोहन धगाटे सर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ सर, एमबीए डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर,सायन्स प्राचार्य डॉ. पी.ए. इथापे सर, व डी.फार्मसी प्राचार्य डॉ.रमेश शिंदे सर तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी आर. के. धेंडे सर, प्रा.भूषण पाचपुते,प्रा.दत्तात्रेय पासलकर, प्रा.एस.सोमवंशी, प्रा.प्राजक्ता पाचपुते, प्रा.प्रतिक्षा ओव्हाळ, प्रा.एस.माकुडे, प्रा.पी.ब्राम्हणेकर, प्रा.योगिता काळाने प्रा.स्वप्निल मचाले व सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तसेच विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
13 %
3.9kmh
0 %
Fri
39 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
41 °
error: Content is protected !!