श्रीगोंदा, ता. १० : प्रत्येक मूल हे आईवडिल व शिक्षक यांच्या संस्कारातून घडते, मुले शिक्षकांनी सांगितलेले ऐकतात कारण त्यांचे आदर्श शिक्षक असतात. मोबाईल, टि.व्ही. यापेक्षा क्रिडांगणावर खेळणं, आनंदानं शिकणं महत्वाचं आहे. त्यामुळे आईवडिलांनी याकडे लक्ष दिल्यास असे विद्यार्थी पुढे निश्चित अधिकारी बनू शकतात असे प्रतिपादन श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त मढेवडगाव येथील जि प उंडेमळा / शिंदेमळा शाळेत आयोजित ‘ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व प्रबोधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या शुभहस्ते कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नयनतारा शिंदे होत्या. यावेळी नवनाथ उंडे, संतोष गुंड यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मढेवडगाव सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश उंडे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच राजकुमार उंडे, मा. उपसरपंच राहूल साळवे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रियांका शिंदे, माता पालक संघाच्या अध्यक्षा प्रतिक्षा सुपेकर , ग्रा पं सदस्या सोनाली उंडे, सुरेखा फापाळे, सुनिता उंडे, योगेश शिंदे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभा उंडे, माता पालक उपाध्यक्षा वर्षाताई शिंदे,ग्रामसेवक वामन खाडे, मधूकर शिंदे, पांडूरंग उंडे,बाळासाहेब फापाळे, अभयसिंह गुंड, माणिकराव मांडे, महेश शिंदे, अक्षय उंडे, सोमनाथ खराडे, अनिल थोरात,तसेच सविता मांडे,सुवर्णा शिंदे, कल्पना उंडे, प्राजक्ता उंडे, रोहिणी वाबळे,आरेका शेख, कविता उंडे,शुभांगी पवार, सुनिता कार्ले,मंदाताई मांडे, सुजाता थोरात,मंदा मांडे,कमल शिंदे, वैशाली शिंदे,तृप्ती शिंदे, अर्चना खराडे, सुलोचना मांडे, श्रद्धा गायकवाड,मीरा जाधव आदि माता,पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. गोरख उंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा उंडे यांनी आभार मानले.