श्री संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव शांततेत व आनंदमय वातावरणात साजरा..!

श्रीगोंदा, ता. १४ मार्च २०२५ : श्रीगोंद्याचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराज यांची यात्रा सोमवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी आनंदात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे दैवत म्हणून श्री संत शेख महंमद महाराज यांचा मोठा नावलौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी त्यांना गुरू मानले होते. त्यामुळे या ऐतिहासिक भूमीला महत्त्व आहे दरवर्षी भरणाऱ्या या यात्रा उत्सवाचे आकर्षण हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते.

यात्रेत हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी बहुसंख्येने हजेरी लावली होती. यात्रेच्या दिवशी सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात डीजेच्या संगीतामध्ये वाजत गाजत शेरनी घेऊन भाविक भक्तांच्या बाबांच्या समाधीवर चादर चढवण्यासाठी रांगा लागल्या होत्या. मनोभावे सर्व भाविक दर्शन घेऊन काही नवसपूर्ती करतात तर काही नवस करून काही मनोकामना माघत असतात. दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी भाविकांची गर्दी होती. सर्व उत्सव शांततेत पार पडला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता त्यामध्ये नामवंत मल्लांनी सहभाग घेतला.

यात्रेचे विशेष करून आकर्षण म्हणजे या यात्रेमध्ये येणारे मोठमोठे पाळणे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे त्याचा सर्वच जण मनमुराद आनंद लुटत असतात. श्री संत शेख महंमद महाराज यात्रा कमिटी व बी.एम.ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पाळणे दर ३० रुपये ४० रुपये केल्याने यात्रेतील सर्व गोरगरीब भाविक भक्तांनी यात्रा कमिटी व बापू माने यांचे कौतुक केले आभार व्यक्त केले.आज सर्वसामान्य जनतेची खऱ्या अर्थाने यात्रा झाली असे म्हणवे लागेल.

यात्रेला कसल्याही प्रकारचे गालबोट न लागता यात्रा शांततेत पार पडली. तसेच यात्रेनिमित्त उत्कृष्ट लोकनाट्य तमाशा रघुवीर खेडकर यांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. श्रीगोंदा तालुका व शेजारील तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी हजेरी लावली होती.अशा प्रकारे खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरण यात्रा पार पडली.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!