आष्टी ते अहमदनगर रेल्वे सेवा सुरू होणार! या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा.!! आ. सुरेश धस यांचे आवाहन

टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.२१ सप्टेंबर २०२२: गेल्या कित्येक दशकापासून बीड जिल्ह्यातील जनता नगर- बीड- परळी या रेल्वे सेवेच्या प्रतीक्षेत होती… स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी या बीड जिल्ह्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अथक परिश्रम केल्यामुळे हा सोनेरी दिवस उगवणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उस्मानाबाद तथा लातूर/बीड मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांनी केले आहे.

दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी११.०० वा आष्टी ते अहमदनगर या रेल्वे सेवेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री ज्येष्ठ नेत्या.आदरणीय पंकजाताईसाहेब मुंडे, खा.डॉ. प्रीतमताई मु़ंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होत आहे.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही आ.सुरेश धस केले आहे.
स्त्रोत(प्रवीण पोकळे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.3 ° C
23.3 °
23.3 °
84 %
6.9kmh
100 %
Tue
23 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °
error: Content is protected !!