राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये परिक्रमा तंत्रनिकेतनच्या खेळाडूंचे घवघवीत यश

श्रीगोंदा, दि. २० मार्च २०२५ : इंटर इंजीनिअरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये समर्थ पॉलीटेक्निक, जुन्नर(पुणे). येथे संपन्न झालेल्या ॲथलेटिक्स या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये परिक्रमा पॉलिटेक्निक चे खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत असे यश संपादन केले.

मुलींमध्ये कु.वैष्णवी शेंडगे हिने २०० मीटर मध्ये प्रथम क्रमांक, तर १०० मीटर मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला व मुलांमध्ये कु.संकेत कोकाटे १०० मी. द्वितीय क्रमांक मिळविला. व अतिशय चुरशीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडूंनी आपले व महाविद्यालयाचे नाव राज्यामध्ये झळकावले.

या खेळाडूंचे परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार विक्रम पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, ॲकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते, मुख्य अति. कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अती. ॲकॅडमी डायरेक्टर संजिवजी कदमपाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, , इंजीनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे, एम.बी.ए. डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ डी.फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे, सायन्स कॉलेज प्राचार्य डॉक्टर पांडुरंग इथापे यांनी अभिनंदन केले. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना परिक्रमा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी सर व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अशोक राहिंज यांचे मार्गदर्शन लाभले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
71 %
9.6kmh
100 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
29 °
error: Content is protected !!