ड्रोन प्रशिक्षण शिबिराचे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन
श्रीगोंदा, दि. ७ एप्रिल २०२५ : बदलत्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान मध्ये सततचा होणारा बदल लक्षात घेऊन भविष्यकाळातील गरजा ओळखून शिक्षण घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल व GDIOT (जीइडियट) यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रशिक्षण शिबिराचे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, ड्रोन तंत्रज्ञान असे विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये ज्ञान मिळाले तर विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व आवड निर्माण होईल. या ड्रोन तंत्रज्ञान मध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी धनराज कोथिंबीरे हा कार्यरत आहे ही देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे असे केले.
यावेळी पहिल्या सत्रामध्ये प्रशिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागवडे इंग्लिश मिडीयम चा माजी विद्यार्थी धनराज कोथिंबीरे यांनी देखील आपले विचार मांडले. GDIOT(जीइडियट) चे संस्थापक अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बोलताना सागितले की कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले तंत्रज्ञान म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान ही काळजी गरज आहे.
यावेळी ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड, सोनिया गांधी पॉलिटेक्निक चे प्राचार्य अमोल नागवडे, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापक नीतू दुलानी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रियांका नागवडे यांनी केले आभार प्रा.सुजाता पाचपुते यांनी मानले. समन्वयक म्हणून प्रा. सुरेश म्हेत्रे यांनी जबाबदारी पार पाडली.