श्रीगोंदा, दि. ८ एप्रिल २०२५ : तालुक्यातील खरातवाडी ग्रामस्थांनी इतर जिल्हा मार्ग क्रमांक २०२ वरील रस्ता नदीपात्रातील पाण्यामुळे बंद झाल्याने त्रस्त होऊन अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. संत तुळशीदास मंदिरामागील नदीपात्रात बंधाऱ्याचे पाणी भरल्याने गावात येणाऱ्या मार्गावर दळणवळण ठप्प झाले आहे. ग्रामस्थांनी आपल्या स्तरावर मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित व्यक्तीने अडथळा निर्माण केल्यामुळे विद्यार्थी, जनावरे आणि गावकरी अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाकडे वारंवार विनंत्या करूनही दखल न घेतल्याने अखेर सोमवारपासून ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नी आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन दादासाहेब जंगले राज्य समन्वयक शेत रस्ते शिव पानंद समिती यांनी भूमी अभिलेख कार्यालय श्रीगोंदा तहसील कार्यालय श्रीगोंदा यांच्या मदतीने इजिमा १३२ पासून पिंपळगांव पिसा खरातवाडी बेलवंडी या शासकीय रस्त्यापासून इजीमा २०२ खरातवाडी ते एरंडोली हा रस्ता मोजणी करण्यासाठी सर्व विभागांची परवानगी घेऊन बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी मोजणी करण्याचे लेखी आश्वासन तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती श्रीगोंदा, यांच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी प्रभारी तहसीलदार प्रवीण मुगदूल, नायब तहसीलदार जाधव साहेब, उपअधीक्षक भुमिअभिलेख सुहास जाधव साहेब, निमतानदार वासुदेव पाटील दादासाहेब जंगले, ऍडव्होकेट जी बी कडूस पाटील, तसेच खरातवाडी येथील लहान मुले विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.