श्रीगोंदा, दि. ९ मे २०२५ : नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक २ मधील इंदिरा नगर परिसरातील नादुरुस्त असणाऱ्या बंद अवस्थेतील पोलवरील स्ट्रीट लाईट चालू करणे, गटर लाईनचे चेंबर दुरुस्त करणे तसेच अनेक दिवसापासून गटार लाईनची स्वच्छता नसल्याने त्वरित स्वच्छता करणे, अनेक दिवसापासून कचरा गाडी येत नाही त्यामुळे त्वरित घंटागाडी चालू करणे या विषयासंदर्भात श्रीगोंदा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले प्रसंगी ओ एस जवक साहेब यांना निवेदन देण्यात आले
यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलताना समस्याचे त्वरित निराकरण करण्यात येऊन प्रभाग क्रमांक दोन मधील इंदिरानगर परिसरात नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यात यावेत सदरील कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी अशी विनंती उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा यांच्यावतीने कोणतीही पूर्व सूचना नदेता शिवसेना स्टाईलने मुख्याधिकारी श्रीगोंदा नगरपरिषद यांचे दालनात ठिया आंदोलन करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी आपणास राहील याची कृपया नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर परिसरातील असंख्य नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, सुरेश देशमुख, वनराज क्षिरसागर, संभाजी घोडके, शिवाजी समदडे, सागर खेडकर, बबन कवडे तसेच शिवसैनिक युवा सैनिक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते