वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचच्या माजीविद्यार्थ्यांचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

श्रीगोंदा, दि. ३० मे २०२५ : कालचा वर्ग, आजचा परिवार! अशी भावना मनात साठवत, वांगदरी विद्यालयाच्या इयत्ता दहावी २००१ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा तब्बल पंचवीस वर्षांनंतर उत्साहात आणि भावनांनी भारलेल्या वातावरणात पार पडला. दिनांक २५ मे रोजी यवत जवळील निसर्गरम्य ‘मेहेर रिट्रीट ऍग्रो टुरिझम’ या ठिकाणी जुन्या मित्र-मैत्रिणींचा पुन्हा एकत्र येण्याचा सोहळा रंगला.

जवळपास ३६ माजी विद्यार्थी, ज्यात २१ मुले व १५ मुली सहभागी झाल्या होत्या, त्यांनी आपली व्यस्त जीवनरेषा थांबवून या खास क्षणासाठी उपस्थिती लावली. अवकाळी पावसाच्या सरी पडत असतानाही जुन्या मित्रांना भेटण्याच्या ओढीपोटी कोणाच्याच पायांना लगाम लागला नाही.

या स्नेहमेळाव्याचे संयोजन गणेश नागवडे, अविनाश जगताप, संतोष सोनवणे, गीतांजली पवार आणि कविता गायकवाड या माजी विद्यार्थ्यांनी हिरीरीने केले. त्यांनी आठवणींच्या या गोफात प्रेमाचे धागे मिसळत मनमिळावूपणाचा झंकार घडवून आणला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांनी आपापला पंचवीस वर्षांचा जीवनप्रवास थोडक्यात कथन करत अनुभवांची शिदोरी उलगडली. शालेय आठवणी, बालमित्रांच्या गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे सूर जणू पुन्हा एकदा हृदयात गुंजले. गप्पागोष्टी, फोटोसेशन्स आणि हास्यविनोदांनी दिवस कसा गेला ते कळलेही नाही!

या स्नेहमेळाव्यास नितीन पवार, शिवाजी चोरमले, वैशाली नागवडे, रेखा नागवडे, वृषाली नागवडे, जयश्री लगड, अनिल जानकर, काका घाडगे, सचिन जाधव, कीर्ती राऊत, अश्विनी सोनवणे, बापू महानोर, भूषण गायकवाड, छाया बडे, धनंजय कोरडकर, जालिंदर काळे, बाळू महानोर, किरण जाधव, मोहन भिसे, पल्लवी दरेकर, पाराजी सरक, रफिक सय्यद, राहुल इथापे, सदा महानोर, संतोष जाधव, सीमा गोरे, सुनीता सुत्तेकर, रूपाली खंडागळे यांसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

अशा या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात नात्यांची उब पुन्हा जागवली, आणि जुने दिवस नव्याने अनुभवण्याचा एक अविस्मरणीय क्षण देऊन गेला अशी भावना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले तर कार्यक्रमाची सांगताकरताना, गणेश नागवडे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील स्नेहमेळाव्यासाठी अधिक उत्साहाने एकत्र येण्याचे आवाहन केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
22.7 ° C
22.7 °
22.7 °
86 %
4.8kmh
84 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
error: Content is protected !!