शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय ऑलिंपियाड व अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

श्रीगोंदा, दि. ६ ऑगस्ट २०२५ :
पुणे येथील एक्सलंट ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय ऑलिंपियाड परीक्षा २०२५ आणि अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले आहे.

ऑलिंपियाड स्पर्धेत राज्यात अव्वल:
प्रसन्ना गोलांडे व अवंती पवार यांनी संयुक्तरित्या राज्यात प्रथम क्रमांक, तर मनस्वी साखरे व विराट नागवडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्वराज कोथिंबीरे केंद्रात प्रथम, तर शिवाज्ञा नागवडे द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाली.

अबॅकस स्पर्धेत चॅम्पियन ठरली राजनंदिनी:
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत राजनंदिनी भोसले हिने चॅम्पियन किताब पटकावला. याशिवाय आर्वी आढाव (तृतीय), शिवम खोमणे (द्वितीय) आणि विराज लोखंडे (तृतीय) यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली.

उत्तेजनार्थ बक्षीस मिळवणारे विद्यार्थी:
ज्ञानेश्वरी जामदार, मनस्वी साखरे, अक्षदा खराडे, ओम कोठारे, महारुद्र कन्हेरे, पियुष गायकवाड, प्रणव नवले, विघ्नेश चव्हाण, सानवी दरेकर, आराध्या गवळी, तनिष्का बोरुडे, आयुष दरेकर, ज्योतिरादित्य जामदार, रुद्र बगाडे, प्रथमेश कोथिंबीरे या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

अधिकार्‍यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन:
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी, शिक्षिका हेमलता काळाने व अश्विनी मचे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

चौकट:
निरीक्षक एस. पी. गोलांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “नर्सरीपासूनच स्पर्धा परीक्षेची नियोजनबद्ध तयारी करण्यात येते. हेच सुयोग्य नियोजन आज यशाचे मुख्य कारण ठरले आहे.” त्यांनी सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
moderate rain
21.7 ° C
21.7 °
21.7 °
94 %
4.7kmh
100 %
Sat
27 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
26 °
Wed
28 °
error: Content is protected !!