श्रीगोंदा, दि. ८ सप्टेंबर :
संभाजी ब्रिगेड पक्षाची भूमिका सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारी असून विशेषतः विद्यार्थी व तरुण वर्गासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत असल्याने आज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पक्षाच्या विद्यार्थी आघाडीत प्रवेश केला.
या वेळी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी तुषार जगधने, उपाध्यक्षपदी आदर्श पवार तर सचिवपदी जीवन ससाणे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत व महिला जिल्हाध्यक्षा राजेश्री ताई शिंदे या होत्या.
तालुकाध्यक्ष इंजी. शामभाऊ जरे यांनी विद्यार्थ्यांच्या मागे मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. तर उपाध्यक्ष दिलीप लबडे यांनी तरुणांनी पुढाकार घेऊन संत महात्मा, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित समाजव्यवस्था उभारावी असे आवाहन केले.
यावेळी पक्षाचे सचिव सुयोग धस, उपाध्यक्ष बापू जगताप, संदिप जगताप, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सद्दाम शेख, उद्योजक आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष सुहास गाडेकर, संघटक संतोष आरडे मेजर, शेतकरी आघाडी उपाध्यक्ष पांडुरंग खोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आदर्श प्रशांत खराडे, वैष्णव कांबळे, सुरज मोरे, निखिल चिखलठाणे, रोहन ढवान, अभिषेक ढोकळे, तुषार गायकवाड, सत्यम सावंत, अनिकेत साळुंखे, सार्थक नलगे, प्रणव जाधव, ऋषिकेश बिबे, मयूर निकर, संदीप डेबरे, दादा औटी, संदीप हिरडे, साहेब शिंदे, अभिजीत दळवी, ओमकार पवार, सार्थक थोरात यांसारख्या अनेक तरुणांनीही संभाजी ब्रिगेड पक्षात जाहीर प्रवेश केला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता आगामी काळात संभाजी ब्रिगेड पक्षाला नवे बळ मिळणार आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.