श्रीगोंदा, दि. १० सप्टेंबर २०२५ :
अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नागवडे स्कूलच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत चमकदार यश मिळवले.
व्हॉलीबॉलमध्ये हॅटट्रिक विजेतेपद
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्ष वयोगट मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावत हॅटट्रिक साधली.
क्रांती कोकरेच्या नेतृत्वाखाली संघाने अप्रतिम खेळ दाखवत विजेतेपद मिळवले.
द्वितीय क्रमांक शिवाजीराव नागवडे डेफिडील्स स्कूलला मिळाला.
तर १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सर्वज्ञा भोर हिने कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करत प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली. श्रावणी कोकरे हिनेही विजयात मोलाची भूमिका बजावली. तृतीय क्रमांक कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलने मिळवला.
बास्केटबॉलमध्ये उपविजेतेपद
तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत शिवाजीराव नागवडे डेफिडील्स स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने मानसी गाडगेच्या नेतृत्वाखाली उत्तम खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. संघात श्रावणी कोकरे, श्रेया अल्हाट, संस्कृती नागवडे, प्रतीक्षा होले, समीक्षा गायकवाड, ईश्वरी साबळे, मयुरी गाडेकर, भक्ती देशमुख, साक्षी गायकवाड, श्रेया वाळके आदी खेळाडू सहभागी होत्या.
मार्गदर्शक व शुभेच्छा
खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक कैलास ढवळे, अक्षयकुमार शिंदे, रोहित दानवे, राजश्री नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
विजयी संघातील खेळाडू :
१४ वर्ष वयोगट मुली (व्हॉलीबॉल विजेते संघ):
क्रांती कोकरे (कर्णधार), आकांक्षा रोडे, जेनी साठे, सई गवारे, सबीका खान, श्राव्या पवार, शरयू कांडेकर, श्रेया दानवे, रिया शिंदे, प्रिया दानवे, अनुष्का शिंदे, आरोही खेतमाळीस.
१७ वर्ष वयोगट मुली (व्हॉलीबॉल विजेते संघ):
सर्वज्ञा भोर (कर्णधार), श्रावणी कोकरे, संस्कृती नागवडे, प्रांजल नवले, समीक्षा गायकवाड, श्रुती आढाव, ईश्वरी साबळे, वैशाली भगत, गायत्री वाबळे, मानसी गाडगे, समीक्षा गाडेकर.