श्रीगोंदा, दि. ११ सप्टेंबर :
यशस्वी राजकारणी, जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा तालुका शाखेतर्फे काष्टी येथील निवासस्थानी उत्साहपूर्ण सत्कार सोहळा संपन्न झाला.
या वेळी बबनदादांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करून त्यांना “माणसातला माणूस” अशी उपाधी देत संघटनेकडून अभिष्टचिंतन करण्यात आले. साधेपणा, आपुलकी, जनतेशी जुळलेली नाळ आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे बबनदादा हे केवळ एक राजकीय नेते नसून लोकांच्या हृदयातील खरे लोकनेते ठरले असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल झेंडे, सचिव मेजर भिमराव उल्हारे, उपाध्यक्ष पंकज गणवीर, सचिन शिंदे, डिजिटल मीडिया अध्यक्ष किशोर मचे, शकीलभाई शेख,पत्रकार उज्वला उल्हारे, रामदास कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी बबनदादांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान बबनदादांना फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या मनोगतात बबनदादांनी पत्रकार बांधवांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, “पत्रकार हे समाजाचे खरे प्रहरी आहेत. त्यांच्याशी असलेली बांधिलकी मी कायम राखीन” असे सांगितले.
हा सत्कार सोहळा अत्यंत नियोजनबद्ध व आत्मीयतेने पार पडला.