टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी दि.२४ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालया मधील एम.एस्सी (रसायनशास्त्र) उत्तीर्ण ३ विद्यार्थ्यांची मुंबई येथील क्लिनकेम लॅब या नामांकित औषध कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी दिली.
गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई येथे प्लेसमेंट सेल मार्फत छत्रपती शिवाजी कॉलेज आणि “क्लिनकेम लॅबोरेटरी” यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. या नामांकीत औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीत,रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील जागांकरिता लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे संस्थापक डॉ.बापू गावडे आणि डायरेक्टर डॉ.अनिल गावडे यांनी सहकार्य केले तर प्लेसमेंट सेल विभागातील प्रा.विलास सुद्रिक यांनी विशेष मेहनत घेतली तर इतर सदस्य प्रा.विजय इथापे आणि प्रा. प्रविण नागवडे यांनी खंबीर साथ दिली.
- राजेंद्रदादा नागवडे आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. कॉलेजचा प्लेसमेंट सेल विभाग २० पेक्षा जास्त कंपनी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून, कॉलेजचे १० विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. म्हणूनच मागील एका वर्षात कॅम्पस मुलाखतीमधून ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत, पुढेही हीच परंपरा कायम राहणार असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य दातीर ,अनिल भोळे, आणि विशाल घाडगे यांचा समावेश आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, रसायनशास्त्र विभागप्रमुख व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
स्त्रोत:(नंदकुमार कुरुमकर)