टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.२६ सप्टेंबर २०२२ : अखंड भारताचे पुनर्वेभव प्राप्त व्हावे हाच ध्यास घेऊन युगप्रवर्तक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी रा.स्व.संघाची स्थापना करून प्राचीन सनातन परंपरेचा विसर पडत चाललेल्या हिंदू समाजाला संघटनेचा मंत्र दिला. असंख्य कार्यकर्त्यांनी भारत मातेच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले या कार्यकर्त्यांच्या असीम त्यागामुळे संघाने विविध क्षेत्रांमध्ये काम करून रा.स्व.संघ ही जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठी शास्त्र शुद्ध संघटना असा लौकिक निर्माण केली असून भारत देश वैभवी राष्ट्र होण्यासाठी राष्ट्रसंघाचे अपूर्व योगदान आहे असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आयोजित सेवा पंधरवडा अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त रा.स्व. संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संघाचे जिल्हा संघचालक श्यामराव भोजने अधिवक्ता परिषदेचे प्रांत महामंत्री बाबुराव अनारसे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चाचे उपाध्यक्ष ऍड.वाल्मीक निकाळजे, कल्याण पोकळे, लालासाहेब कुमकर,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख उपप्राचार्य डॉ.सुनील पंढरे, नाना देशमुख ,दीपक किंबहुने ,पांडुरंग बळे, हिरा सेठ बलदोटा , रामदास डोरले ,गजानन कुलकर्णी ,शिवाजी पोपळे ,सुनील सानप, मुर्शदपुर ग्रामपंचायत सरपंच सचिन लोखंडे ,आष्टीचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,पत्रकार रघुनाथ कर्डीले, पत्रकार प्रविण पोकळे,नगरसेवक अक्षय धोंडे, कपिल अग्रवाल,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा मुख्य आधार हा समाजासाठी सर्वस्व झोकुन देऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता देश हित हाच उद्देश ठेवून काम करणारा कार्यकर्ता हा आहे .हिंदू समाजाचे संघटन करून प्रलोभनाने इतर धर्म मध्ये धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात प्रवेश देण्याचे महान कार्य विश्व हिंदू परिषद करते आहे हिंदू हिताला प्राधान्य देणारी भाजपा ही क्रियाशील देशभक्तांची पार्टी आहे या पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील होऊ शकतो हे सर्व जगाने पाहिलेले आहे पक्ष संघटनेचे काम हे घोडा तगडा असला तरी एका जागेवर उभा राहिल्यास त्याच्या खुराला मुंग्या लागू शकतात म्हणून तो सतत हलता राहिला पाहिजे असे आहे म्हणजेच कार्यकर्ता हा सतत कार्यप्रवण राहिला पाहिजे अशी कामाची योजना या पक्षामध्ये राबवली जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व भारतीय राजकारणामध्ये पाठवले आणि त्यांनी आदर्श कार्यपद्धती राबवून देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे हिंदुत्वाचा विचार प्रकट करण्याची भीती वाटावी अशी परिस्थिती असताना आज जगामध्ये हिंदुत्वाच्या विचाराचे अनुकरण होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज जागरी पातळीवर सन्मान मिळत आहे. आपण यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार समन्वय समितीशी सतत समन्वय ठेवू असे त्यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये हिराशेठ बलदोटा, रमेश ढगे,लालासाहेब कुमकर, श्याम भोजने, शंकर देशमुख आणि ॲड.वाल्मीक निकाळजे यांची समायोजित भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील सानप यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेला असणाऱ्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)