टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.२६ सप्टेंबर २०२२ : आष्टी हंबर्डेवस्ती येथील शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.गेल्या चार वर्षांपासून नवरात्र उत्सवात तुळजापूर येथून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची ज्योत घेऊन येण्याची परंपरा आहे.ती परंपरा कायम ठेवत याही वर्षी शिवप्रेमी तरूण मंडळाच्या जवळपास ४० युवकांनी श्री क्षेत्र तुळजापूर ते हंबर्डेवस्ती मोठ्या श्रद्धेभावाने पायी ज्योत आणली आहे.
गेल्या चार वर्षांपासून शिवप्रेमी तरुण मंडळ हंबर्डे वस्ती येथील युवक पायी ज्योत महोत्सवात सहभाग घेऊन एक दिवसात जवळपास १७० किमी अंतर पायी चालत तुळजापूर येथून ही ज्योत घेऊन येतात.यामध्ये यावर्षी ॲड.महादेव मोहिते, लक्ष्मण नेमाने,गोरख हंबर्डे, शुभम हंबर्डे, सुनील मोहिते, शिवम हंबर्डे, शिवाजी पोकळे, मयूर हंबर्डे, सुशील हंबर्डे, अमोल हंबर्डे, ऋषिकेश हंबर्डे, सोमनाथ हंबर्डे, भरत हंबर्डे, अशोक मोहिते, सोमनाथ मोहिते, महेश काळे, निलेश हंबर्डे,राम नेमाने,प्रदीप हंबर्डे, किरण हंबर्डे,अशोक हंबर्डे,साधू मोहिते,मल्हारी हंबर्डे,सतीश हंबर्डे,महेश काळे,अनिल बामदाळे, परसराम हंबर्डे,पृथ्वीराज हंबर्डे आदींसह ४० युवक सहभागी झाले होते.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)