टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२८ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्र शासन-कृषी विभाग,तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांच्या मार्फत रब्बी हंगाम पीक निहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत घुगलवडगाव येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला त्यावेळी सरपंच मिलिंद कदम यांच्या उपस्थितीत रब्बी ज्वारी फुले रेवती वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी शेतकरी मेळाव्यात मंडळ कृषी अधिकारी शितल आरू मॅडम यांनी कृषी विभागाच्या योजनां विषयी मार्गदर्शन केले कृषी पर्यवेक्षक मुळे साहेब यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंड आळी नियंत्रणाबाबत व कामगंध सापळे वापरण्या बाबत मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक कल्याणी मते मॅडम यांनी ज्वारी पिकाच्या लागवड तंत्रज्ञाना बाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच मिलिंद कदम,ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी गटाचे अध्यक्ष अंकुश गलांडे आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
स्त्रोत:(आप्पासाहेब चव्हाण)