टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२८ सप्टेंबर २०२२ : विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव सेवा संस्था ही ७१वर्षांपासून अविरत सुरु असून सभासद हिताचा विचार करून तातडीने सुलभ कर्जपुरवठा करणारी आपली सेवा संस्था असून संस्थेची वसुली शंभर टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार असून संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हिताच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ दांगडे यांनी केले.
- सोसायटी पदाधिकारी व संचालक मंडळ :
- गोपीनाथ हिरु दांगडे(चेअरमन)
सुनिल रामदास पवार(व्हा. चेअरमन)
अनिल दिनकर जगदाळे(सचिव)
सतिष किसन दांगडे,
रामदास दशरथ दांगडे,
बाळकिसन जनार्धन कदम,
रविंद्र भिमराव गलांडे,
बाळू बबन गलांडे,
नानासाहेब बापुराव पवार,
सविता गौतम दांगडे,
रावसाहेब मारुती ननवरे,
आप्पासाहेब नामदेव चव्हाण,
शांताराम खंडू दांगडे,
शहाजी हरिभाऊ दांगडे,
सुनिता राजेंद्र दांगडे,
रोहिदास हरिचंद्र दांगडे,
घुगलवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या आवारात घेण्यात आली यावेळी सभेचे अध्यक्ष चेअरमन गोपीनाथ दांगडे बोलताना म्हणाले की संस्थेची वसुली ७४.९५ टक्के आहे. सभासदाना जिल्हा बँकेच्या माध्यमातून जलद कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सभासद करून घेणार असून त्यांना कर्ज वाटप करण्यात येईल.आगामी काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासद हिताच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे दांगडे म्हणाले यावेळी सचिव अनिल जगदाळे यांनी विषय वाचन केले.उपाध्यक्ष सुनील पवार सर्व संचालक ,सभासद ,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(आप्पासाहेब चव्हाण)