आढळगाव विद्यालयाच्या विध्यार्थ्यांच्या सोयीसाठी अंडर ग्राउंड रस्त्याची मागणी; माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी घेतली जिल्हा अधिकारी यांची भेट!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२९ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या आढळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी श्रीगोंदा ते जामखेड या रस्त्यालगत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालया समोरील खेळाच्या मैदानाकडे ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत असल्या कारणाने विद्यालयाचे प्राचार्य एस.एस. साळुंखे यांनी मा.जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या कडे अंडरग्राउंड रस्त्याची मागणी केली.

  • आढळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय हे जास्त विद्यार्थी संख्येचे विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचे खेळाचे मैदान मुख्य रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे विध्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना रस्त्यावरील रहदारीचा सामना करावा लागतो त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते.त्यामुळे अंडरग्राउंड रस्ता किंवा रस्त्यावर ब्रिज दोन्ही पैकी एक करणे आवश्यक आहे.

त्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ अनिळ ठवाळ यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन. निवेदनाद्वारे अंडरग्राउंड रस्त्याची मागणी केली व सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन. शुक्रवारी सदर ठिकाणी आपण भेट देऊन सदर इस्टीमेट त्वरित संबधित कार्यालयाकडे सादर करावे.असे सक्त आदेश दिले.व इतरही सर्व कामे लवकरात लकर मार्गी लावावे.असे निवेदनात म्हटले आहे.
स्त्रोत:(सचिन शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.5 ° C
23.5 °
23.5 °
84 %
4.6kmh
94 %
Wed
23 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
error: Content is protected !!