टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३ ऑक्टोबर २०२२ : नगर-पुणे महामार्गा वरती बेलवंडी फाटा मोटे वाडी नजीक नाथ कृपा वेल्डिंग वर्क्स या नवीन गाड्यांच्या बॉडी बांधणाऱ्या वेलडींग वर्क शॉप मध्ये दिनांक २ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ च्या सुमारास पुण्यावरून नगरच्या दिशेला जाणाऱ्या बिगर नंबर प्लेट फक्त च्याशी असलेला कंटेनर हायवे रोड वरील डिव्हायडर क्रॉस करून थेठ नाथ कृपा वेल्डींग वर्कस या दुकाना समोर वेलडींग काम करत आसणार्या MH 16 CE 9394 या आयसर टँम्पो ला जाऊन जोराची धटक दिली.ही धडक येवढी भयंकर होती की त्या ठिकाणी दुकानाचे शटर व तेथील गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्या ठिकाणी एकच कामगार काम करत होता बाकी कामगार गोडाऊनमध्ये मटरेल आणण्यासाठी गेले होते त्यामुळे मोठा अनर्थ टळला, तसेच अपघात होताच तेथील गाडीने पेट घेतला होता.परंतु तेथील नागरिकांनी ताबडतोब ती आग विझवली त्यामुळे तेथील वाहनांचे नुकसान होण्यापासून वाचले परंतु दुभाजक क्रॉस करून आलेला वाहनाचा ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत होता अशे तेथील प्रथम दर्शनी नागरिक सांगत आहे.या वर्कशॉप चे मालक विजय टिळेकर यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा अपघात बेलवंडी पोलीस स्टेशन च्या कार्यक्षेत्रामध्ये झाला आहे.बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कोळपे,व पोलीस गुंड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे व पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)