लिंपणगाव येथे रब्बी हंगाम पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण व ज्वारी प्रकल्पातील बियाणे वाटप!!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३ ऑक्टोबर २०२२ : सोमवार दि.३ ऑक्टोबर २०२२ रोजी मौजे लिंपणगाव येथे रब्बी हंगाम पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण व ज्वारी प्रकल्पातील बियाणे वाटप करण्यात आले, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांचे कडून मौजे लिंपणगाव येथे रब्बी हंगाम पीक तंत्रज्ञान याविषयी आज प्रशिक्षण आयोजित करण्यात आले

प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी रब्बी हंगामातील पिकांविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागातील विविध योजनांची शेतकरी बांधवांना माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक संतोष झेंडे यांनी केले.

या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी श्रीमती शीतल आरू तसेच कृषी पर्यवेक्षक किसन सांगळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागवडे सर यांनी मानले.

या प्रशिक्षणासाठी गावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
scattered clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
74 %
6.5kmh
33 %
Sun
26 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °
error: Content is protected !!