भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रथमच श्रीगोंदया मधील दिल्ली वेस येथे दसरा तोरण बांधण्यात आले; शिवदुर्गचे गडकिल्ले दसरा तोरण उपक्रम!!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.५ ऑक्टोबर २०२२ : विजया दशमीच्या निमित्ताने शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे वतीने दसरा सणाचे निमित्ताने गडकिल्ले व ऐतिहासिक वारसा स्थळांना तोरण बांधण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले धर्मवीरगड, श्रीगोंदा येथिल दिल्ली वेस व नाशिक जिल्ह्यातील अजिंक्य रामशेज किल्ल्यावर दसरा तोरण बांधण्यात आले.

“आधी तोरण गडाला मग घराला” दसरा तोरण ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. ही परंपरा दरवर्षी जपण्याचा प्रयत्न शिवदुर्ग परिवार करत आहे.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन ही संस्था दरवर्षी किल्ले धर्मवीरगड गडाच्या वेशीला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधते. व गडाचे पूजन करते.यावर्षी पाचवे वर्ष आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या पानीपत वीरांची शौर्यगाथा आसलेल्या दिल्ली वेस श्रीगोंदा येथेही प्रथमच दसरा तोरण बांधण्यात आले.

  • दिल्ली वेस अपशकुनी वेस नव्हे तर पानीपत वीरांची शौर्यगाथा सांगणारी ही वेस आहे. दसरा सणाला घराला तोरण बांधण्याची आपली संस्कृती व परंपरा आहे. “आधी तोरण वेसीला मग आमच्या घराला” भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रथमच दिल्ली वेस येथे दसरा तोरण बांधण्यात आले. असे उदगार शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी काढले.

यावेळी किल्ले धर्मवीरगड येथे तालुका प्रमुख अक्षय गायकवाड, संचालक अजित दळवी, अभिजीत जठार, सुचित्रा दळवी निरंजन दळवी,दिपांजली-शिवांजली दळवी यांनी दसरा तोरण बांधले. श्रीगोंदा दिल्ली वेस येथे जालिंदर पाडळे, मारूती वागसकर, नितीन शेळके, ॲड.गोरख कडूस,दिगंबर भुजबळ , मच्छिंद्र लोखंडे , हेमंत काकडे, निरज पाडळे, आविष्कार इंगळे, आर्यन कडूस यांनी दसरा तोरण बांधले.

नाशिक जिल्ह्यातील किल्ले रामशेज येथे शिवदुर्ग मावळा संकेत लगड याने गडाला दसरा तोरण बांधले.
स्त्रोत:(शिवदुर्ग ट्रेकर्स)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.7 ° C
24.7 °
24.7 °
74 %
6.9kmh
100 %
Wed
29 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
23 °
Sun
25 °
error: Content is protected !!