गुरुकुल उच्चाधिकार चे सदस्य हरिदास नवले यांचा गुरुमाऊली मंडळात प्रवेश!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.७ ऑक्टोबर २०२२ : अहमदनगर जिल्हा गुरुकुल उच्चाधिकार समितीचे जेष्ठ सदस्य श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षक नेते हरिदास नवले यांनी गुरुकुल मंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळून मंडळाचा त्याग केला असून बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला आहे.

गुरुकुल मंडळांनी शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना असंख्य चुका केल्या आहेत तालुक्यांनी सुचविलेली नावे डावलून आपल्या मर्जीतील उमेदवार दिले आहेत या उमेदवारी देताना तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली गेलेली नाही. श्रेष्ठींच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण गुरुकुल मंडळाचा त्याग केल्याचे हरिदास नवले यांनी सांगितले

गुरुकुल मंडळाच्या नेत्यांनी स्वतः उमेदवारी घेतल्या ज्यांच्या सेवा कमी राहिल्या आहेत अशा तीन साडेतीन वर्षे सेवा असणाऱ्या शिक्षकांना उमेदवारी दिल्या काही माजी संचालकांना उमेदवारी दिल्या काही ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे त्यामुळे गुरुकुल साठी सतत राबणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे त्याचबरोबर उमेदवारी देताना सारासार विचार न केल्याने काही तालुक्यांमध्ये उमेदवारांवर जे बालंट आले आहे त्यामुळे मंडळाची प्रतिमा मलीन झाली आहे ज्या मंडळाशी युती केली त्यांच्यातही फूट पडली आहे आणि निवडणुकीच्या सुरुवातीला असलेले वातावरण चुकीच्या उमेदवारी दिल्याने बदलून गेले आहे नेतृत्व स्वार्थी वृत्तीने बेभान झाले आहे कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये गुरुकुल चे कार्यकर्ते मंडळ सोडण्याचे तयारीत आहेत असे हरिदास नवले यांनी सांगितले.

अहमदनगर येथे झालेल्या गुरुमाऊली मंडळाच्या मेळाव्यामध्ये हरिदास नवले यांचे स्वागत गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव जिल्हाध्यक्ष अंजली मुळे राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, संतोष दुसुंगे, शरदभाऊ सुद्रिक, राजू राहाणे,
अर्जुन शिरसाट, बाबासाहेब खरात, बाळासाहेब मुखेकर,आर टी साबळे,बँकेचे विद्यमान चेअरमन किसन खेमनर,व्हाईस चेअरमन सुयोग पवार, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब दातीर, मंडळाचे अध्यक्ष अरविंद शिर्के, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा कोथंबिरे, राजू राऊत, संजय सोनवणे, आदर्श शिक्षक रामदास ठाकर, रमेश सुपेकर, प्रमोद शिर्के, संतोष सोनवणे ,राजेश इंगळे ,संदीप होले आदिंनी स्वागत केले.
स्त्रोत:(ठाकर सर)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.3 ° C
21.3 °
21.3 °
95 %
8kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
27 °
Wed
29 °
error: Content is protected !!