टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१२ ऑक्टोबर २०२२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन खो- खो स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेते पद मिळवले अंतिम सामन्यात अटीटतीच्या लढतीत चांगल्या कामगिरी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे अश्रु दाटून आले.
अहमदनगर येथील न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पार पडल्या . शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संघातील खेळाडू हर्षदा महाडिक , ढोले स्नेहल व सरक जयश्री यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. यावेळी प्राचार्य निवड महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच झावरे, जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव रोहित आदलिंग उपस्थित होते. पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी हर्षदा महाडिक , ढोले स्नेहल, सरक जयश्री, खामकर पूजा, वाळुंज प्रतीक्षा या पाच मुलींची उत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड करण्यात आली.
यावेळी खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद मिळविल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करन्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र नागवडे, महाविद्यालयाचे विश्वस्त प्रा.सुरेश रसाळ, सुभाष शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. बी. एन. सोनवणे, पर्यवेक्षक सी. आर. कातोरे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सतीश चोरमले व जुनिअर क्रीडा शिक्षक प्रा. महेश गिरमकर यांनी मार्गदर्शन केले.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)