टीम लोकक्रांती : शिरूर प्रतिनिधी दि.१६ ऑक्टोबर २०२२ : चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते रामचंद्र जगताप सहाय्यक गट विकास अधिकारी शिरूर यांना पुणे जिल्हा परिषद यांच्या कडून दि.१५ ऑक्टोबर रोजी उत्कृष्ट पंचायत समिती कार्यालय कामकाज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरूर तालुका येथील पंचायत समिती येथे कार्यरत असलेले सहाय्यक गट विकास अधिकारी रामचंद्र जगताप साहेब यांना पुणे जिल्हा परिषद,पुणे यांच्या कडून उत्कृष्ट पंचायत समिती कार्यालय कामकाज हा पुरस्कार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना सहाय्यक गट विकास अधिकारी शिरूर रामचंद्र जगताप साहेब आणि सोबत सहकारी बरोबर होते.
हा पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्त्रोत:(काका सांगळे)