विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची भेट अग्नीपंखचा फौंडेशनचा अब्दुल कलाम जयंती उपक्रम

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. १६ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने आढळगाव येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची भेट देऊन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली.
सुरुवातीला पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव व रयत शिक्षण संस्थेचे जनरल सदस्य सुभाष गांधी सरपंच शिवप्रसाद उबाळे माजी सभापती विलास भैलुमे यांचे हस्ते शालेय साहित्यांची भेट देण्यात आली.

पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव म्हणाले कि डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे कठीण परिस्थितीत जीवनात भरारी घेणाऱ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत आहे विद्यार्थींनी या महामानवाचा आदर्श डोळ्यासमोर करिअर करावे

सुभाष गांधी म्हणाले कि, आढळगाव चे विद्यालय तालुक्यात नावाजलेले असुन या विद्यालयात शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी घडले आहेत स्पर्धेच्या युगात खाजगी शाळांचे मोठे आव्हान असून स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांना आता गाफील राहून चालणार नाही.

शरद जमदाडे यांनी अग्निपंख फाउंडेशनने गेल्या चार वर्षात उभा केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.

  • एकच ड्रेस आणि डोळ्यात पाणी…
    मला दहावी पर्यत शाळेचा एकच ड्रेस असायचा बारावी पास झालो पैशा अभावी इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून दिले डी एड केले नंतर एम पी एस सी च्या परिक्षा दिल्या आणि पोलिस उपाधीक्षक झालो खडतर परिस्थितीने मला जीवनात उभे केले शालेय जीवनातील जुन्या आठवणी सांगताना आण्णासाहेब जाधव यांचे डोळे भरून आले.

यावेळी जिजाराम डोके, देवराव शिंदे, माऊली उबाळे राजाराम काळे, सत्यवान शिंदे, दादासाहेब गव्हाणे, शिवदास शिंदे एन.टी. शेलार भाऊसाहेब वाघ उपस्थित होते.सूत्रसंचालन बापूराव काळे यांनी तर आभार प्राचार्य साळुंखे यांनी व्यक केले.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.5 ° C
23.5 °
23.5 °
84 %
4.6kmh
94 %
Wed
23 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
error: Content is protected !!