टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२१ ऑक्टोबर २०२२ : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅकेच्या निवडणुकीत जिल्हयातील सुज्ञ सभासदांनी बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वा खालील गुरुमाऊली – २०१५ मंडळास प्रथम पसंती देऊन प्रचंड मताधिक्याने संचालकांना निवडून दिले. सभासदांनी टाकलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन श्रीगोंद्याचे नूतन संचालक संदीप मोटे पाटील यांनी केले.
शिक्षक बँक संचालक पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक बन्सी उबाळे होते. याप्रसंगी तालुक्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचाराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते प्रचारप्रमुख प्रमोद शिर्के यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मोटे पुढे म्हणाले की मागील दोन वर्षात संचालक मंडळाने केलेला सभासद हिताचा कारभार कामी आला. यावेळी बोलताना गोकूळ कळमकर म्हणाले की आम्ही कोणावर टिका टिपणी करण्यापेक्षा आमचे काम मांडले. बापूसाहेब तांबेंचे तरुण नेतृत्व जिल्ह्याने स्विकारले.
कार्यक्रमास पारनेरचे संचालक कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, जिल्हा संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकूळ कळमकर, रामकृष्ण मेहेत्रे, चंद्रकांत गट, बाबा काळघुगे , पोपट शिंदे, सचीन परांडे, अशोक कळमकर,जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे, कर्जतचे संचालक बाळासाहेब तापकीर, मा. चेअरमन शरद सुद्रीक, अनिल टकले, विश्वस्त नवनाथ दिवटे, जामखेडचे संचालक संतोष राऊत , विश्वस्त मुकूंद सातपुते, संघाचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, नगरचे विश्वस्त राजेंद्र निमसे, श्रीगोंद्याचे विश्वस्त गणेश गायकवाड, संतोष आंबेकर, मा. व्हा.चेअरमन उषाताई बनकर, आर . टी.साबळे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब दातीर, गुरुमाउली मंडळाचे अध्यक्ष अरविंद शिर्के, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा कोथिंबीरे, प्रकाश कौठाळे, संपत तरटे, संजय ओहोळ, विठठ्ल ईश्वरे, डॉ. संतोष मोटे, युवराज मोटे, जेष्ठ शिक्षक साहेबराव शिंदे, भगवान गायकवाड, शाखाधिकारी किशोर शिंदे, अनिल इकडे आदि शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद शिके आणि भाऊसाहेब दातीर यांनी तर आभार रामदास ठाकर यांनी मानले.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)