टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२१ ऑक्टोबर २०२२ : सुरेश पांडुरंग खरात रा. खरातवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी सस्टेनेबल ॲग्रो कमर्शियल फायनान्स लि. या कंपनीकडून सन २०१६ मध्ये शेतामध्ये विहीर व कांदा चाळ चे बांधकाम करण्यासाठी रक्कम रु. ३,३०,०००/- चे कर्ज घेतलेले होते. परंतु सदर कर्जाची त्यांनी वेळेत परतफेड केली नाही. त्यामुळे कंपनीने मागणी केली असता आरोपी सुरेश पांडुरंग खरात याने त्याचे व त्यांचे पत्नी पार्वती सुरेश खरात या दोघांचे खात्याचा रक्कम रु. ६८,३०७/- चा धनादेश कर्जाच्या रक्कमेच्या परतफेडीसाठी दिला होता. सदरचा धनादेश कंपनीने त्यांचे बँकेमध्ये भरला असता तो न वटता परत आला.
त्यामुळे कंपनीने आरोपी सुरेश पांडुरंग खरात व पार्वती सुरेश खरात यांच्या विरुद्ध अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आय. एम. नाईकवाडी यांचे कोर्टात निगोशिएबल इंस्ट्रमेंट्स अॅक्ट कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीमध्ये कंपनीतर्फे मिलिंद पाटील व रविकिरण गोपालघरे यांचा जबाब व त्यांनी दाखल केलेले कागदपत्र ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीस रक्कम रु.१,१०,०००/- दंड करून दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
सदरची रक्कम भरण्यात आरोपी यांनी कसूर केल्यास आरोपी यांना १५ दिवसाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी कंपनीतर्फे अॅड. तेजस्विनी काकड यांनी काम पहिले. त्यांना अॅड. गणेश वरंगळे व अँड. अमृत पवार यांनी सहाय्य केले.
स्त्रोत:(न्यायालयीन आदेश)