टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.८ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन संदीप मोटे पाटील यांचा सत्कार श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला.
माझे बालपण मढेवडगावात गेले. त्यावेळी आम्ही गावात ग्रामपंचायतीचा टी.व्ही. पाहायला यायचो. आज बदललेले ‘ स्मार्टग्राम ‘ पाहून या गावची वाटचाल आदर्श गावाच्या दिशेने होत आहे. गावच्या या विकासात सरपंच महानंदा फुलसिंग मांडे, तसेच उपसरपंच दिपक गाडे यांचेबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्याचा वाटा आहे. माझा ग्रामस्थांनी केलेला हा सन्मान चिरकाल स्मरणात राहील असे गौरवोदगार जिल्हा शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन संदीप मोटे पाटील यांनी व्यक्त केले. मढेवडगाव ग्रामपंचायतीने केलेल्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सरपंच उदयसिंह बाबा वाबळे होते. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर व गुरुमाऊली चे प्रचार प्रमुख प्रमोद शिर्के यांनी बँकेबाबत तसेच इतर मान्यवरांनी उच्चशिक्षित शिक्षकाला ही संधी मिळाल्याबदद्ल त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास सोसायटीचे मा. चेअरमन वसंतराव उंडे, ग्रा.पं सदस्य काळूराम ससाणे, अमोल गाढवे, मा. उपसरपंच गणेश मांडे, माणिकराव जाधव, गेनानाना मांडे, मेजर मोहन शिंदे, उमाकांत राऊत, जिजाबापू झिटे, प्रल्हाद खेडकर आदी उपस्थित होते. अमोल गाढवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. फुलसिंग मांडे सर यांनी आभार मानले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा